Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.10: [May 1748] Hingne from Delhi to Peshwa at Poona. Reports the fear wi the Emperor entertains about Raghoji Bhosle invading Bengal and stopp the Bengal revenues coming into Delhi.

Selections from the Peshwa Daftar 2.10

Language
Marathi

[May 1748] Hingne from Delhi to Peshwa at Poona. Reports the fear wi the Emperor entertains about Raghoji Bhosle invading Bengal and stopp the Bengal revenues coming into Delhi.

2.10.1

श्री.

2.10.2

पुरवणी श्रीमंत राजश्री......पंतप्रधान

2.10.3

स्वामीचे सेवसी.

2.10.4

विनंति. नवाब अमीरखान जिवंत असतां आम्ही राजा रघुनाथदास हैदर-कुलीखानी याचा पुत्र लाला नरसिंगदास नवाब मशारनिलेच्या विचारानरूप बंगात्यास पाठविला, तेव्हां महाबतजंगास लिहिलें होतें जे पातशहाच्या आज्ञेप्रमाणें श्रीमंत स्वामीनी बंगाल्याच्या तहाची बोलीचाली राजश्री स्वामीसी ठीक करून राजश्री रघूजीबाबांस बंगाल्यास जायाची मनाई पाठविली आहे. कदांचित आज्ञा उल्लंघून करून जाईल म्हणून वराडांत सत्रा लिंगाडें त्याजभोंवतीं उभीं केलींत, व सरदारांस दोन तीन वार पत्रें पाठविलीं कीं, इतका प्रयत्न केला असतां कदांचित निघून बंगाल्याकडे चाललाच तर तुम्ही पटणे व गयाप्रांतीं आडवे होऊन तंबी करणें. त्यास श्रीमंतस्वामीच्या आज्ञेप्रमाणें सरदारानी तयारी केली. बुंधेलखंडाच्या सरदेवर आहेत. पटणे गयाप्रांती येतात. रकारनामक आला तर पारपत्य करतील. तुम्ही आपल्या नायबांस लिहून पाठवणे कीं, या फौजेचा कोण्हेहि गोष्टीचा संदेह न धरतां सुखरूप आपल्याले स्थलीं स्वस्थचित्तें राहात व पातशाही खजाना झाडियानसी पाठऊन देणेकीं कराराप्रमाणें पैका श्रीमंत-स्वामीचे विद्यमानें राजश्री स्वामीस पावे; व पुढें त्या मुलकाचा उपद्रव तुटे, यैसे आम्ही व अमिरखासानी महाबतजंगास लिहिलें होतें; व लाला नरसिंगदासा-हातींहि हेंच सांगून पाठविलें होतें. त्यास नवाब महाबतजंगानें थैल्या तीन पाठविल्या आहेत. त्यास सरदारांच्या थैल्या दोन पाठऊन सेवेसी बजिनस थैली पाठविली आहे. अवलोकनेनंतर जें लिहिलें असेल तें कळों येईल. आम्हांस तों इतकेंच लिहिलें आहे, व नरसिंगदासाहातीं लिहविलें आहे कीं, जेव्हां राज्या-सींच बोली चाली ठीक जाली; तेव्हां रघोजीबावाचा यावयाचा संशये किमर्थ ? राज्यांचा चाकर आहे. मुलकाचा तह जाला. आतां बोलावून घ्यावा.

2.10.5

यैसेंही असतां श्रीमंत स्वामीसारख्यांस जेव्हां तो जाईल यैसा संशये आहे. तेव्हां माझ्यानें फौज कसी दूर करवते व मुलूक कोणत्याप्रकारें वस्ता होऊं पाहतो व झाडून पैका मी कोठून पाठऊं ? असो मी युध्यप्रसंगास सिधच आहें. आला तर मारितच आहे. न आला तर अखरसालपर्यंत जो खजाना जमा होईल तो पाठऊन देतच आहे. तुम्ही सरदारांस लिहा कीं, जर रघोजी येणारच असला तर रामगड अथवा पचेट अगर उडेशाँच्या मार्गं बंगाल्यांत येईल, तुम्ही पटणे गया प्रांतीं बसून काये कराल ? जर तुम्हांस आगाउ समाचार तहकीक पावला कीं रघोजी तत्वता वराडांतून निघाला व क्षेपनिक्षेप बंगाल्यास येतो यैसे तुम्हांस ठीक कल-ल्यावर तुम्ही न बोलावतां व न लिहितां नीट बंगाल्यास येणें. तुम्ही व आम्ही मिळून त्यांस मारूं. जर आम्हांस आगाऊ समाचार पावतो तर आम्हीच सरदारांस वर्तमान पावतें करितों. माझें पत्र पावेल तेव्हां त्यानी नीट बंगाल्यास यावें, यैसें माहाबतजंगानें आम्हांस लिहिलें. व नरसिंगदासाकडूनहि लिहविलें त्याचें उत्तर आम्ही त्यांस तावडतोब लिहून पाठविलें कीं, लक्षवाटे रघूजीबावास श्रीमंत स्वामीनी दक्षर्णेत गोवले आहे. यकूण वीस विश्वे त्यास येऊं देतच नाहींत. कदाचित येखादा वाटा चालला तर सरदार बुंदेलखंडाच्या सरदेवर जाऊन बसले आहेत. यांच्या दवावानें कदापि तों येणारच नाहीं. तथापि आलाच तर दरकूच जाऊन पारपत्य करितच आहेत. तुम्ही आपल्या जागां मात्र सावध राहणें व पातशाही खजाना झाडियानसी पाठऊन देणें. या प्रकारें आम्ही माहावतजंगास उत्तर लिहिलें; व हजूरच्या उमद्याकडून याच प्रतीची द्रव्याविशईं ताकीद लिहविली आहे. स्वामींनीं थैलीचा जाब जो लिहावयाचा असेल तो सीघ्र आम्हांपासीं पाठविला पाहिजे. ईश्वरइच्छेने व स्वामीच्या प्रतापें रघूजीबाबांचें येणें होतच नाहीं.

2.10.6

येसा भरंवसा असिला तर येतद्विषईं जे खातरजमा करून ल्याहावयाची ते लिहावी व रुपयांविषईं बहुतसी ताकीद करून ल्याहावी की तनखा हेप्रमाणें पांच लाख रुपये पत्रदर्शणी बापूजी माहादेवापासीं पाबते करावे. व पातशाहीखजाना येकदाम बाकी न ठेवितां झाडियानसी दिलीस रवाना करावा, म्हणजे कराराप्रमाणें राजश्री स्वामीचे रुपये श्रीमंत स्वामीचे हातून सत्वर पावतें होत आणि पुढें उपसर्ग त्या मुलकाचा तुटे. रुपये सत्वर न पावल्या, पातशहा आमचीहि तनखा तुम्हांवरच करिल व आपल्याहि खजिन्याची सजावली आम्हांसच सांगेल. तेव्हां आम्हांसतो ज्यारीतीनें काम होय त्यारीतीनें सजावली कं आटरावी लागेल. यास्तव पैका सत्वर पाठवावा. याप्रकारें द्रव्याविशईं ताकीद लिहिविज्ञापना. जर यंदा रघूजीकडील खातरजमा असली तर माहावतजंगास खोलून ल्याहावें कीं रघूजीस सहसा येऊं देत नाहीं. जिंमा आमचा जाला. तुम्ही [१] दूर करणें व पैका झाडियानसी दिलीस पावणें. येसें लिहिलेप्रमाणें नरसिंगदासासाठीं हि च्यार गोष्टी लिहाव्या कीं तो उमदा माणुस आहे. आम् जाबसालास तुम्हांपासीं ठेविला आहे. त्याचा गौर सर्व प्रकारें करित जा येसैंहि अगत्यरूप लिहिलें पाहिजे. सेवेसीं श्रुत होये. बहुत काय लिहिणें. केली पाहिजे हे विनंति.

2.10.7

[१ अलीवर्दीखान.]

2.10.8

[२ ओर्च्छा.]