Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.10.5

Selections from the Peshwa Daftar 2.10.5

Language
Marathi

2.10.5

यैसेंही असतां श्रीमंत स्वामीसारख्यांस जेव्हां तो जाईल यैसा संशये आहे. तेव्हां माझ्यानें फौज कसी दूर करवते व मुलूक कोणत्याप्रकारें वस्ता होऊं पाहतो व झाडून पैका मी कोठून पाठऊं ? असो मी युध्यप्रसंगास सिधच आहें. आला तर मारितच आहे. न आला तर अखरसालपर्यंत जो खजाना जमा होईल तो पाठऊन देतच आहे. तुम्ही सरदारांस लिहा कीं, जर रघोजी येणारच असला तर रामगड अथवा पचेट अगर उडेशाँच्या मार्गं बंगाल्यांत येईल, तुम्ही पटणे गया प्रांतीं बसून काये कराल ? जर तुम्हांस आगाउ समाचार तहकीक पावला कीं रघोजी तत्वता वराडांतून निघाला व क्षेपनिक्षेप बंगाल्यास येतो यैसे तुम्हांस ठीक कल-ल्यावर तुम्ही न बोलावतां व न लिहितां नीट बंगाल्यास येणें. तुम्ही व आम्ही मिळून त्यांस मारूं. जर आम्हांस आगाऊ समाचार पावतो तर आम्हीच सरदारांस वर्तमान पावतें करितों. माझें पत्र पावेल तेव्हां त्यानी नीट बंगाल्यास यावें, यैसें माहाबतजंगानें आम्हांस लिहिलें. व नरसिंगदासाकडूनहि लिहविलें त्याचें उत्तर आम्ही त्यांस तावडतोब लिहून पाठविलें कीं, लक्षवाटे रघूजीबावास श्रीमंत स्वामीनी दक्षर्णेत गोवले आहे. यकूण वीस विश्वे त्यास येऊं देतच नाहींत. कदाचित येखादा वाटा चालला तर सरदार बुंदेलखंडाच्या सरदेवर जाऊन बसले आहेत. यांच्या दवावानें कदापि तों येणारच नाहीं. तथापि आलाच तर दरकूच जाऊन पारपत्य करितच आहेत. तुम्ही आपल्या जागां मात्र सावध राहणें व पातशाही खजाना झाडियानसी पाठऊन देणें. या प्रकारें आम्ही माहावतजंगास उत्तर लिहिलें; व हजूरच्या उमद्याकडून याच प्रतीची द्रव्याविशईं ताकीद लिहविली आहे. स्वामींनीं थैलीचा जाब जो लिहावयाचा असेल तो सीघ्र आम्हांपासीं पाठविला पाहिजे. ईश्वरइच्छेने व स्वामीच्या प्रतापें रघूजीबाबांचें येणें होतच नाहीं.