Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.117.31

Selections from the Peshwa Daftar 2.117.31

Language
Marathi

2.117.31

आवईहि नाहीं. नजीबखानावरच मोरचेबंदी करून होते. तिकडील अवसर पाहून येथील रागड्यास जरब आठ पंधरा दिवस राहून द्यावी. जैसा विचार करून थोर तोफखाना आणून बलवाडा ठाणे भारी जोम राखीत होते त्याजला मोरचे लाऊन जेर केले. विचित्र(क?)मादीत वगैरे राजावत व सेकावत सुलतानवत ठाण्यात होते ते बहुत बजीद होऊन कौल मागू लागले. त्यास आपल्या राज्याची रीत शरणास निग्रह न करावा जैसे जाणून त्यास जिवानसी काढून देऊन ठाणे आपले कायम केले. येणेकरून तमाम जागाजागाचे रजपूत भयाभीत जाले. उव्हेर सरदे सेवाड झिलाये आदीकरून सर्वांची राजकारणे येऊन मामलेतीचा प्रकार बोलू लागले. त्याजकडे आमचा हाडोतीचा मुलूक आहे तो सोडून घ्यावा. त्याची वतनाची जागा त्यास देऊन मामलत करावी. हे कार्य आठापंधरा दिवसांत करून पुढील मनसबा बातनी येईल त्याप्रो करावा जैसे होते. त्यास छ ७ जावली (28-12-1759) फिरोन राजश्री जनकोजी सिंदे याजकडील पत्रे आली कीं आम्ही नजीबखानाकडील मनसबा सोडून गिलज्याकडे जातों. कुजपुरीयापासी यमुना उतरोन आलों. तुम्ही तिकडील सहस्त्र कार्य टाकून जलद यावें म्हणून बहुत निकडीने लिहिले. त्यास तिकडील कार्य आधी कर्तव्य. इकडील महालची वगैरे मागे दोन साले नुकसानी आली. त्याप्रमाणे तिसरें साल जाले ते पुरवले. सर्व अर्थ पाहून मनसबा करावा म्हणून स्वामीची आज्ञाही आली. गिलज्याचे पारपत्य आधी करणे उचित जाणून छ १३ जावली (3-1-1760) कूच करून मुकाम मजकुरास आलों. तोंफखाना जुन्याकडे माघारा लाविला. इकडील मनसबा सर्व सोडून थोरथोर मजली करून गिलज्याचे पारपत्यासी जात असो. सांप्रत बातमीची पत्रे आज आली कीं आबदालीखासा मागेच आहे. ज्याहानखान अबदुल समधखान मातबर फौजेनसी कुरुक्षेत्राआलीकडे आला. राजश्री दत्तबा संडे फौजेने पुढे गेले. राजश्री जनकोजी सिंदे व वजीर याजला बुनगेसहवर्तमान मागे ठेविले. गिलज्या ठाणेश्वरीहून आलीकडे आला. पहिले आपल्या त्याच्या हरोलींची झटपट जाली. मागाहून दत्तबााहि जाऊन पावले. याचे त्याचे एक जूज उत्तम प्रकारे होऊन नजीक बुढिया मुकाम जाला. आपल्या फौजााहि मुकाम करून राहिल्या. रात्री गिलज्या घाट मजकूर यमुना उतरोन पार अंतरवेदीत गेला. आपली फौजहि मागाहून उतरोन जाणार जैसे वर्तमान आले. सुज्यातदौला आपले हदेवर आहे. नजीबखान वगैरे रोहिले श्वत्रतालावर आहेत. जाटाकडील रूपशम आपल्या फौजेत होता तो सांप्रत दीलीकडे नागरमला बा आला. खासा आपल्या जागावर आहे. वरकड रजपूत आपलाले स्थली आहेत. आमच्या जाण्यामुळे माधवसिंग थंडेसे जाले. गिलज्याकडे सूत्र लाविले आहे. त्याजला इकडे यावयासी मोठे अनुमोदन नजीबखान माधवसिंग उभयेतांचेच आहे. वरकड दुरोन आहेत. प्रस्तूत काले कोणाचेहि कपट राहणार नाहीं. ज्याचे जैसे चलण त्याप्रमाणे निदर्शनास येईल. तदनुसार फल पावतील. इकडील कर्तव्यर्थ मनसबा होणे स्वामीचे प्रतापे उत्तम होऊन येईल. देशी नगरचा किला वगैरे येकदोन ठाणी घेऊन जागिरीचा तह होत आहे. बहुत उत्तम आहे. पुढील विचारहि सर्व साहेबाचे मनोदयानरूप होऊन अमित्र पादाक्रांत होतील. वजीर सांप्रत राजश्री जनकोजी सिंदे याजपासी आहे. त्यास त्याचे पदानरूप चलण नाहीं आणि शाश्वत काडीमात्र नाहीं. श्वता सामर्थ्य कलतच आहे. परंतु बट्टेबाजीची वर्तणूक टाकीत नाहीं. भेट जाली म्हणजे अणुप्राय होऊन केले कर्म परिमार्जन करितो. अस्तु. आपल्या कर्तृत्वानरूप फळ पावल. शेवेसी श्रुत होये हे विज्ञापना.