Selections from the Peshwa Daftar 2.intro.8
Selections from the Peshwa Daftar 2.intro.8
- Language
- Marathi
2.intro.8
श्रीगजाननप्रसन्न
[seal: INAM COMMISSION B]
श्रीमंत नानासाहेबपंत
प्रधान
पोश्या काशीराव सिवदेव विनंप्रति साष्टांग नमस्कार
कांही आह्मी विनंति केली ते चित्तीं न आणतां स्वामीनी
दुसरियाच्या भलत्यांचे सांगण्यावरून आपल्या सेवकास लिहिले
येशें नसतें स्वामी कृपाळू होऊन आपल्या सेवकास सांभाळावे
हें सोडून भलत्या कामास प्रवृत्त व्हावे ऐसा विचार सिद्धान्त
नव्हे ऐसें स्वामींनीं चित्ती आणून येथें सेवा व्हावी असा प्रकार
करावा आणि स्वामींनीं पत्र पाठविले तें यास न दाखवितां हेंच पत्र
यथास्थित यांसी दाखवूं ऐसें समजोन आपल्या नावांचें
पत्र पाठविले त्यावरून यांसी पत्र दाखविले त्यांनीं पत्रांत
एकवार वाचलें आणि लगत्यांच्या मित्रांच्या लगत्यांवरून खोटें
नाठें लिहून पाठविले त्यावरून स्वामींनीं पत्र पाठविलें
आह्मी आज तीस वर्षे सेवा करितों स्वामींनीं अशा प्रकारें
करूं नये आह्मीं आज तीस वर्षे सेवा करितों आह्मीं आज तीस
वर्षे स्वामींच्या जवळून आहों याजवर स्वामी अनुकूल व्हावें
स्वामींनीं रीस आणोन भलत्यांच्या सांगण्यावरून यथास्थित लिहित
नाहीत आह्मीं स्वामींचे सेवकास असें न व्हावें स्वामींचे पायांवर
माथा ठेऊन विनंति केली आहे त्यावरून स्वामींनीं
जाणून सेवकास सांभाळावे हे विनंति बहुत काय
लिहिणे कृपा असों द्यावी हे विनंति सेवेशीं
पायपोशी काशीराव सिवदेव मुकाम
साहेबानुरंगद सातार मुकाम विनंति सेवक काशीराव
हस्ताक्षर स्वतःचे
The letter of Kashiraj Shivdeo. (Vide No. 148)