Selections from the Peshwa Daftar 29.102: [19-12-1765] The political situation in the North is the subject-matter of this lengthy letter from Malhar Tukdeo at Jaipur to Raghunathrao starting Northward. Reports of the invading Maratha army have greatly enhanced Maratha prestige. Jhansi and Orcha have been reoccupied and the army under Sindia and Holkar,
Selections from the Peshwa Daftar 29.102
- Language
- Marathi
[19-12-1765] The political situation in the North is the subject-matter of this lengthy letter from Malhar Tukdeo at Jaipur to Raghunathrao starting Northward. Reports of the invading Maratha army have greatly enhanced Maratha prestige. Jhansi and Orcha have been reoccupied and the army under Sindia and Holkar,
29.102.1
छ १ शाबान उर्फ माघ
29.102.2
सन सीत.
29.102.3
श्रीशंकर
29.102.4
श्रीमंत राजश्री दादासाहेब स्वामींचे सेवेसी.
29.102.5
विनंती सेवक रामचंद्र तुकदेव चरणावरी मस्तक ठेऊन सा नमस्कार विनंति विज्ञापना. येथील क्षेम ता पौश शुध ८ आस्टमी परियंत साहेबाचे प्रतापेंकरून मु॥ सवाई जयेनगर यथास्थित असे. यानंतर साहेबी कृपाळु होऊन आज्ञापत्रे * * * ८ सफरचे मितीची सादर * * * * * सेवकास मार्गेश्वर वद्य ५ प्रविष्ट जाली * * * * बहुत आनंद जाला. पत्री आज्ञा सादर जाली की भारी फौज मातबर तोफखानियानसी त्या प्रांते खासा स्वारी जलद येत असे. तुम्ही तिकडील वर्तमान वरचेवरी लिहून पाठवीत जाणे म्हणोन आज्ञा सादर जाली. त्यासी येकोन चितास बहुत आनंद जाला. साहेब या प्रांते येणार हा दबाव या मुलकात बहुत पडत चालिला आहे. साहेबाचे प्रतापेकरून सर्व गोष्टी होऊन येतील. साहेबाचे आज्ञेप्रमाणे इकडील वर्तमान वरचेवरी लिहून सादर करीत असो. सांप्रत या प्रांतीचे वर्तमान तरी राजश्री मलारजी बाबा सुबेदार व राजश्री माहदजी सिंदे पाटील साहेब सर्व फौजेनसी एका विचारे होऊन झासी प्रांतीचा बंदोबस्त करून दतिया बोडशाची मामलत ठराऊन तेथील निशापात होत आहे. तेथून पुढे भिड गोहदप्रांते कूच जाले म्हणोन वर्तमान निश्चये आहे. जाट नारहरसिंगजी बराबर आहे. त्याचा बंदोबस्त करून द्यावा हा करार जाला आहे. याजकरिता जोहरमल जाट याजवरी शेह दिल्हा आहे. जाबसाल लागला आहे. पैकियाचा निकाल करून दिलियास सलुख राहील. नाहीतर मुलकात सिरोन धूम करीत असो. त्याजवरून जाट जोहरमल आपल्या जागा मनसुब्रियात आहेत. सिखांसी त्याचा पैगाम लागला आहे. गुरुचे सीख सरहिंद प्रांताकडून उतरले होते * * * * * फौज घेऊन पुढे पानिपताकडे * * * * * सीख चालोन आले. याची त्याची लढाई मातबर झाली. उभयेताकडील माणसे बहुत पडली. नजीबखान जागाच आहेत. सीख पार उतरोन गेले. ते जमाव येका जागा करीतात. भारी जमाव करून जाट आपण येक होऊन भारी मनसबा करावा हा विचार त्याचा आहे. जाट जोरमल आगरियात आहेत तेथ सर्व विचार होत आहे. राजश्री सुभेदारसाहेब पातशाह येक होऊन आगरियासी जाणार हा विचार आहे. पातशाह अलीगाहर याजकडून सहफुदीमहमद आले होते ते करारमदार राजश्री सुभेदारसाहेब यांसी करून पातशाहकडे गेले. येका जागा जालियावरी विचार पका करून पातशाह अलीगाहर यानी प्रयागीहून कूच करून दाहा बारा कोस आलीकड साहाराणपुरास आले. तेथूनहि पुढे कूच जाले. कुरा जहानबादेस दाखल होणार. तेथून भारी मनसुबा करावा हा विचार आहे. नवाब सुजायतदऊले लखणूस आहेत व अहमदखान बंगस सर्वांकड पैगाम गेले आहेत. राजश्री सुभेदारसाहेब याची पातशाहची भेटी जालियावरी काये मनसबा होतो, सामील कोठे होतात, ते सविस्तर साहेबाचे शेवेसी लिहीत असो. राजश्री सुभेदार साहेब याचे कूच जाले म्हणोन वर्तमान आहे. निश्चये अर्थ अलिया सविस्तर लिहीत असो. विशेष पा(तशाह) जादा आहे. जाबतेखान सर्व बंदोबस्त * * * * * कडजाणार. जाटानी आपली फौज दिलीकड पाठविली आहे. रतनसिंग जाट ( ) राजे माधोसिंगजी याच्चेहि सरदेत धूम करीतात याजवरोन याच्या चितातहि त्यासी कजिया करावा येसे आहे. यानी आपली फौज दुलेराये बक्षी व जयेचंद व खानसामा याजबरोबर आठ दाह हजार येका जागा करून कानोडेकडे पाठविली आहे. तेथे ठाकूर आनरुधसिंगजी याचा भाऊ रतनसिंग खंगारोत आहे. त्यानी बदमामली दाखविली त्याजवरोन त्यासी कजिया करोन तेथ आहे. जाटाचेहि सरदेवरी दबाव देऊन आहेत. पाहवे काये मनसुबा पुढे होईल. राजे माधोसिंगजी
29.102.6
4222 आपले जागा विचार मनसबा आहेत. राजे हरसाहेजी व ठाकूर राजसिंग हमीरदेव दिवान बलचंदचा वर्ग बहुत पेश आहेत. सर्व कारभार त्याजवरी आहे. राजश्री सुभेदाराकडील मामलेतीचा जाबसाल भट राजे सदाशिवजी ठाकूर शामसिंग हमीरदे याचे विद्यमाने आहे ते निकाल फडशा करितात. साहेबाकडीलहि दबाव उतमप्रकारे पडत चालिला आहे. आज्ञापत्राचा अर्थ हुजूर जाऊन माहराज राजे माधोसिंगजी याचा मुनसी रामकिसन याचे विद्यमाने निवेदन केला. सत्वर येणार त्यासी राजे माधोसिंगजी बोलिले की आम्ही सर्व प्रकारे मनसुव्यास सादर असो. राजश्री सुभेदार यासी सलुख केला हलकिस्तीचा येवज पावता केला. बाकी साहूकाराकड राहिली. त्याचाहि निकाल करून द्यावयाचा ताकीद ? * * * * * * वरोबा सर्व प्रकारे सुभेदारासी * * * त्यासी स्नेहाने असो. श्रीमंत साहेबाचे शेवेसी ल्याहावे म्हणून आज्ञा केली. त्याप्रमाणे साहेबाचे त्याचे सांगितल्याप्रमाणे अर्थ लिहिला आहे. राजे माधोसिंग याचा विचार सर्व प्रकारे ममता संपादन घ्यावयाचा आहे. सर्व विचार साहेबाचे प्रतापाचा आहे. प्रतापेकरून सर्व होईल. राजश्री आच्युतराव गणेश व राजश्री खानाजी जाधव दाह हजार फौजेनसी किसनगडानजीक मुकाम करून आहेत. वरकड उदेपूर शाहपुरा रूपनगर येथील मामलत चुकविली. निशापात होत आहे. किसनगडवाला बदमामली करीतो. त्याच्या गावावर दंगा आरंभिला आहे. किसनगडचा बंदोबस्ती पहवरसिंग करून आहे. त्यासी कजिया लागला आहे. गावे मारीतात. त्याजकडील तह बसल्या राजश्री पाटीलबावाकड जातील. मारवाडचा करार दाहा आलाकर्णी चारण करार करून गेले त्याप्रमाणे राजे बिजेंसिंगजीनी कबूल केले. सलुखात आहेत. निकाल करून द्यावयाची तरतूद होत आहे. राजश्री अच्युतरावजी अजमेरीस बंदोबस्त करून याजकड दबाव देणार. येक दोन पत्रे आज्ञाधारकास पाठविली. त्यासी राजे माधोसिंगजी याजकडील कारभारी यानी राजश्री सुभेदार याजकड लिहिले आहे. त्याजकडील आज्ञा येईल त्याप्रमाणे वर्तणूक करीन * * * * * * * येवजा तगादा करीता वर जाला * * * * * * * सिष्टाचा संपदून घेतील येसे वर्तमान होईल ते सविस्तर साहेबाचे शेवेसी लिहीत असो. जाट नाहरसिंगजी यानी आपले कनिले ढवलपुरी होते तेथून काढोन जयेपुरास पाठविले आहेत. राजश्री सुभेदारसाहेब यानी सरकारतर्फेने राजश्री जगनाथरावजी तेथे होते त्याजसमागमे राजे माधोसिंगजी यासी पत्रे देऊन पाठविले आहेत. कबिले त्याच्या ठिकाणी बदनपुऱ्यात ठेऊन गौरसी करावी मनसुव्यास सादर व्हावे , त्याजवरोन जगनाथरावजी जाटाचे कबिले घेऊन जयेपुरास आले आहेत. कंबिले दाखल आलियावरी सर्व अर्थ लिहीत असो. राजश्री जगन्नाथरावजी याची मुलाजमत जाली. भेटी घेऊन नारहरसिंगजी याचे कंबिले बासईंसनिध आले. तेथून घेऊन यावयासी गेले आहेत. राज्याची भेटी जालियावरी काये सला विचार याजकडील भावगर्भ सर्व लिहीत असो. वरकड लाहोराकडील वर्तमान तरी लाहोरात सिखांचा बंदोबस्त आहे. पठाण खंडारात आहे. तेथ विचार मनसबा करीत असे. सिखांचा बंदोबस्त सरहिंदपावतो उतम जाला. पुढेहि धूम करीत चालिले आहेत. पुढे जे वर्तमान ध्यानास येईल ते लिहीत आसो. आज्ञाधारकास राजश्री सुभेदाराकडून येवज खर्चास देविला त्याचा * * * * * * त्याजकडून येवज पदरी पडे ते करावयासी साहेब धणी समर्थ आहेत. आज्ञाधारक आज्ञेप्रमाणेच वर्तणूक करील. श्रुत जाले पाहिजे. विशेष काय लिहीणे. राजश्री जाणोजी भोसले याजकडील वकील आनंदसरूप सिष्टाचार घेऊन आले होते. त्यासी सिष्टाचार संपादून राज्यानी माघारे वाटे लाविले. आम्हास बोलावून सांगितले कीं सिष्टाचार मात्र त्यासी वरकड विचार काही नाही ते लिहिले असे. कुफिया अर्थ ध्यानास आल्या लिहीत असो. साहेबाचे शेवेसी विज्ञाति.