Selections from the Peshwa Daftar 29.102.6
Selections from the Peshwa Daftar 29.102.6
- Language
- Marathi
29.102.6
4222 आपले जागा विचार मनसबा आहेत. राजे हरसाहेजी व ठाकूर राजसिंग हमीरदेव दिवान बलचंदचा वर्ग बहुत पेश आहेत. सर्व कारभार त्याजवरी आहे. राजश्री सुभेदाराकडील मामलेतीचा जाबसाल भट राजे सदाशिवजी ठाकूर शामसिंग हमीरदे याचे विद्यमाने आहे ते निकाल फडशा करितात. साहेबाकडीलहि दबाव उतमप्रकारे पडत चालिला आहे. आज्ञापत्राचा अर्थ हुजूर जाऊन माहराज राजे माधोसिंगजी याचा मुनसी रामकिसन याचे विद्यमाने निवेदन केला. सत्वर येणार त्यासी राजे माधोसिंगजी बोलिले की आम्ही सर्व प्रकारे मनसुव्यास सादर असो. राजश्री सुभेदार यासी सलुख केला हलकिस्तीचा येवज पावता केला. बाकी साहूकाराकड राहिली. त्याचाहि निकाल करून द्यावयाचा ताकीद ? * * * * * * वरोबा सर्व प्रकारे सुभेदारासी * * * त्यासी स्नेहाने असो. श्रीमंत साहेबाचे शेवेसी ल्याहावे म्हणून आज्ञा केली. त्याप्रमाणे साहेबाचे त्याचे सांगितल्याप्रमाणे अर्थ लिहिला आहे. राजे माधोसिंग याचा विचार सर्व प्रकारे ममता संपादन घ्यावयाचा आहे. सर्व विचार साहेबाचे प्रतापाचा आहे. प्रतापेकरून सर्व होईल. राजश्री आच्युतराव गणेश व राजश्री खानाजी जाधव दाह हजार फौजेनसी किसनगडानजीक मुकाम करून आहेत. वरकड उदेपूर शाहपुरा रूपनगर येथील मामलत चुकविली. निशापात होत आहे. किसनगडवाला बदमामली करीतो. त्याच्या गावावर दंगा आरंभिला आहे. किसनगडचा बंदोबस्ती पहवरसिंग करून आहे. त्यासी कजिया लागला आहे. गावे मारीतात. त्याजकडील तह बसल्या राजश्री पाटीलबावाकड जातील. मारवाडचा करार दाहा आलाकर्णी चारण करार करून गेले त्याप्रमाणे राजे बिजेंसिंगजीनी कबूल केले. सलुखात आहेत. निकाल करून द्यावयाची तरतूद होत आहे. राजश्री अच्युतरावजी अजमेरीस बंदोबस्त करून याजकड दबाव देणार. येक दोन पत्रे आज्ञाधारकास पाठविली. त्यासी राजे माधोसिंगजी याजकडील कारभारी यानी राजश्री सुभेदार याजकड लिहिले आहे. त्याजकडील आज्ञा येईल त्याप्रमाणे वर्तणूक करीन * * * * * * * येवजा तगादा करीता वर जाला * * * * * * * सिष्टाचा संपदून घेतील येसे वर्तमान होईल ते सविस्तर साहेबाचे शेवेसी लिहीत असो. जाट नाहरसिंगजी यानी आपले कनिले ढवलपुरी होते तेथून काढोन जयेपुरास पाठविले आहेत. राजश्री सुभेदारसाहेब यानी सरकारतर्फेने राजश्री जगनाथरावजी तेथे होते त्याजसमागमे राजे माधोसिंगजी यासी पत्रे देऊन पाठविले आहेत. कबिले त्याच्या ठिकाणी बदनपुऱ्यात ठेऊन गौरसी करावी मनसुव्यास सादर व्हावे , त्याजवरोन जगनाथरावजी जाटाचे कबिले घेऊन जयेपुरास आले आहेत. कंबिले दाखल आलियावरी सर्व अर्थ लिहीत असो. राजश्री जगन्नाथरावजी याची मुलाजमत जाली. भेटी घेऊन नारहरसिंगजी याचे कंबिले बासईंसनिध आले. तेथून घेऊन यावयासी गेले आहेत. राज्याची भेटी जालियावरी काये सला विचार याजकडील भावगर्भ सर्व लिहीत असो. वरकड लाहोराकडील वर्तमान तरी लाहोरात सिखांचा बंदोबस्त आहे. पठाण खंडारात आहे. तेथ विचार मनसबा करीत असे. सिखांचा बंदोबस्त सरहिंदपावतो उतम जाला. पुढेहि धूम करीत चालिले आहेत. पुढे जे वर्तमान ध्यानास येईल ते लिहीत आसो. आज्ञाधारकास राजश्री सुभेदाराकडून येवज खर्चास देविला त्याचा * * * * * * त्याजकडून येवज पदरी पडे ते करावयासी साहेब धणी समर्थ आहेत. आज्ञाधारक आज्ञेप्रमाणेच वर्तणूक करील. श्रुत जाले पाहिजे. विशेष काय लिहीणे. राजश्री जाणोजी भोसले याजकडील वकील आनंदसरूप सिष्टाचार घेऊन आले होते. त्यासी सिष्टाचार संपादून राज्यानी माघारे वाटे लाविले. आम्हास बोलावून सांगितले कीं सिष्टाचार मात्र त्यासी वरकड विचार काही नाही ते लिहिले असे. कुफिया अर्थ ध्यानास आल्या लिहीत असो. साहेबाचे शेवेसी विज्ञाति.