Selections from the Peshwa Daftar 1.s2-76: [Feb. 1760]
Selections from the Peshwa Daftar 1.s2-76
- Language
- Marathi
1.s2-76
श्रीमार्तंड भैरव जीतु (जयतु) प्रा.
* विनंती उपरी प्राथकालींच पत्र आपणाकडे पाा त्यावरून ध्यानास येईल. बहुतक आपण कूच करून आज वाडीवर जातील. आपण गेले म्हणजे आम्ही जातेगांवाहून कूच करून कनलीकर सुधा डोंगरात जातां. कळावे. मुकाम नेहमींच होईल. कालचे वर्तमान आपणाकडील काय ठार कोणी जाया जाले म्हणून वर्तमान आहे. काल आमचे लोकानी दाटी करून खिडकीपर्यंत गेले. मागे फिरते समई व आणिक लोक जातां दोन तीन जाया जाले. कळावे. कृष्णाजीपंताचे पत्र पाा आहे. पावेल. आपले कडील व वरचे सविस्तर ल्याहावे. श्रीमंत दादासाहेब कूच करून कोठें आले हे ल्याहावें.