Selections from the Peshwa Daftar 1.s2-88: [20-2-1760] The writer gives some idea about the attitude of Nimbalker and Jadhao after the negotiations.
Selections from the Peshwa Daftar 1.s2-88
- Language
- Marathi
1.s2-88
श्रीविठ्ठलराज.
छ ५ *जाखर सितैन
श्रीमंत महाराज राजश्री भाऊसाहेब
कृपासागर स्वामीचे सेवेसी.
आज्ञाधारक त्रिंबक जगंनाथ सां। नमस्कार विज्ञापना ऐसीजे. येथील वर्तमान ता॥ छ ४ माहे रजब मुकाम किले धारूर माहाराजांचे प्रतापे-यथास्थित असे विशेष. छ ३ माहे मजकूरी राजश्री हणमंतराव निंबाळकर यांस येवनाकडे वकील आहेत त्यांचीं पत्रे आलीं. त्या * * * * * लिहिला आहे कीं चिंचोलीवर नवाबाचा मुकाम आहे * * * * * सल केली. येथूनच कूच करून अवसी याचे रोखे भागानगरास जानार आहेत. भालकीपर्यंत गेलियावर जाधवरायास निरोप देऊन आपण स्वस्थानास जावें. जाधवराव वकिलासी बोलले कीं राव येथें आले असते तरी त्यासी व नवाबासी आपन गोडी करून देतों. वकिलानी त्याचा जौब दिधला कीं आमचे येजमानाचे वाकडे काय आले कीं आपन गोडी करून द्यावी. पूर्वी नवाबास भीमार्तीरीं वेढा पडला होता त्या वर्षी आपन आले नव्हतेत. तैसेच राव धारूर पावेतर आले. पुढे येयाचा प्रसंग दुर्घट देखिला. तेथेच मुकामान केले. हे वर्तमान ऐकून राव निंबाळकर वकिलाचे जौबसालावर बहुत समाधान पावले. व त्यांस उतर लिहून पाठविले कीं तुम्ही जाधवरायासी जौबसाल यथास्थित केला. छ मजकूरी राजश्री हणमंतराव निंबाळकर यांची मातोश्री व पांच कुटुंब येथे येऊन पोहोचली. राजश्री लक्ष्मणराव खंडागळे हे येथे आहेत. माहाराजांचे सेवेसी विनंतीपत्र पाठविलें असे. त्याचीं उतरे यावयाची मार्गप्रतिक्षा करितात. राजश्री गणपतराव सबनीस व महिपतराव शंकर येथे आले. रायांची व त्यांची भेट करून त्यांचे समागमे राऊत देऊन वाटे लाविले. विशेष काय लिहिणे. हे विज्ञाप्ती.
[* पेवस्तीचा महिना चुकीचा दिसतो.]