Selections from the Peshwa Daftar 1.s2-87: [20-2-1760] Letter of Ramchandra Krishna to Bhausaheb acquainting him how the Nizam gave a pledge in writing to hand over Bijapur to the Marathas.
Selections from the Peshwa Daftar 1.s2-87
- Language
- Marathi
1.s2-87
श्री.
पौ छ ५ रजबू सितैन
फाल्गून.
श्रीमंत राजश्री भाऊसाहेब
स्वामींचे सेवेसी.
विनंती सेवक रामचंद्र कृष्ण कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती. येथील कुशल ताा छ २ माहे रजब मा लस्कर नवाब बसा लतजंग नजीक कल्यान जाणौन माहाराजानी निजानदवैभवलेखनआज्ञा करीत असिले पाहिजे. यानंतर माहाराजानी श्रीमंत राजश्री नानासाहेब यास पत्र दिल्हे. त्याजवरोन वस्त्रे व पालखी वगैरे देऊन पत्रे लिहून दिल्ही की, यास तुम्हाकडे वकिलीस पाठविले आहेत. जो जाबसाल करीत जाल तो यासी करणे. ऐसीयास सेवक कूच दर कूच येऊन राजश्री नागो राम याच्या लस्करात कल्यानाहून साता कोसावर आहे. तेथे उतरलो. तो छ १ माहे मजकुरी च्यार घटी दिवस राहिला ते समई माहाराजाची पत्रे व खलिता नवाबास आला. ते पत्रे राजश्री नागो राम यानी दाखविली, व म्हणाले की, आताच जा व मुलाजमतहि करा; आणि सनदा द्यावयाविशई काय जाबसाल करितात? माहाराजानी लिहिले की जलद सनद करोन पाठवने. त्याजवरोन पाच राऊत समागमे घेऊन च्यार घटका रात्रीं नवाबाची भेट घेतली. पुढे नबाबा-जवळ सेवक आला नव्हता. तेव्हा राजश्री भवानजी ताकपीर व धोडो आगदेव हे पाठविले होते. त्याचिहि मुलाजमत जाली होती. माहाराजानी लिहिले त्याप्रा सविस्तर मजकूर केला. आणि सनद विजापूरची तयार करोन घेतली. आनी राजश्री नागो राम याजकडे राजश्री धोडो आगदेव याचे हवाला करोन पाठविली. माहाराजास कलावे. कोनी मातबर माणूस सेवेसी पाठवितो म्हणोन बोलले. कोण मुकरर करून पाठवितात त्याप्रा लिहीन. सविस्तर वर्तमान मागून लिहितो. येथे फौज तो सात हजार गाडदी व पाच हजार फौज गुलाम मोहेदिनखान व राजे ब्रिजनाथ व दोन हजार खाजगत येकून सात हजार श्बार आहेत. व तोफ बासष्ट आहेत. कलावे. येथे वर्तमान आहे कीं, सलाबतजंगाचे व याचे मानस येक आहे. याची त्याची भेट होणार. हे येका दो रोजानी कूच करोन सिरसीस तेहि येणार व हेहि जाणार. ऐसे वर्तमान आहे. पुढे जे होईल ते सेवेसी लिहीन. बहुत काये लिहीणे. हे विज्ञापना.