Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.1: [23-2-1747] This is an important letter giving news of the Imperial Court to the Peshwa at Poona. It is sent by the Maratha agents Hingne brothers from Delhi. The letter of Nadirshah quoted in the report will convince the student how closely Ahmadshah Abdali followed the policy of Nadirshah.

Selections from the Peshwa Daftar 2.1

Language
Marathi

[23-2-1747] This is an important letter giving news of the Imperial Court to the Peshwa at Poona. It is sent by the Maratha agents Hingne brothers from Delhi. The letter of Nadirshah quoted in the report will convince the student how closely Ahmadshah Abdali followed the policy of Nadirshah.

2.1.1

श्री.

2.1.2

पौ छ ५ रविलाखर

2.1.3

श्रीमंत राजश्री पंत प्रधान

2.1.4

स्वामिचे सेवेसी.

2.1.5

विनंती सेवक बापूजी माहादेव व दामोदर माहादेव सां। नमस्कार विनंती. येथील कुशल ता॥ छ २४ मांहे सफर मु॥ इंद्रप्रस्थ स्वामीचे कृपावलोकने यथास्थित असे विशेष. स्वामीकडील कृपापत्रे छ ५ जिल्हेजची सरकारच्या जोडी-बराबर छ २० मोहरमी पावलीं. तेथें आज्ञा कीं, नादरशाहाकडील व दिलीच्या अमिराचें व हिंदुस्थानच्या राज्याचें वगैरे जें नवलविशेष वर्तमान येत जाईल तें लिहीत जाणें म्हणोन आज्ञा केली. जैसीयास पूर्वी नवाब उमदतुलमुलुक शांत जाले, तेव्हा मुजरद कासदांची जोडी सेवेसी राा केली; व येक जोडी दुसरीहि पाठविली. त्या दोही जोड्याबराबर या प्रांताचें साकल्य वृत्त लिहीले आहे. सेवेसी श्रुत जाले असेल. सांप्रत नादरशाहाकडील वर्तमान जैसे आहे कीं, याचा रुमवाल्याचा सल्लुक जालियांहि हा स्वदेशास परतून आला. आपल्या मुलकाचा बंदोबस्त करून प्रस्तुत येकाच ठिकाणीं काहीक दिवस छावणी करून राहिला आहे. मिर्जा नसरुला पातशाहजादा व तहमासकुलीखां या दोघास काबुलेकडे मार्गस्त केले. महमदशाहास व नवाब वजीर व नवाब मनसूर अलीखान यांस पत्रें पाठविली आहेत, जे मजला हिंदुस्थानातून येऊन आठ नव वर्षे जालीं. अद्याप तुम्ही स्वदेशाचा कांहीं बंदोबस्त केला नाहीं. परस्पेरें येकतों जे, चाकर कोण्ही चाकरीच्या मार्गें वर्तत नाहींत, आपलाले ठिकाणीं खावंद होऊन राहिले आहेत. याकारितां मुलकांत गनिमाचा गलबला विशेष आहे. म्या इतकी तुम्हांस ताकीद केली असतां तुम्हीं मुलकाच्या बंदोबस्ताचा कांहींहि प्रेत्न न केला. मजसारखा पक्षपाती असतां, सर्व प्रकारें मी तुम्हास अनकूल असतां, आज तुम्ही आपले पातशाहीचा बंदोबस्त न कराल तर कधीं करणार ? अद्यापहि कांहीं गेले नाहीं. दोन दिवस सुखावर मन न ठेवितां मिरजा नसरला व तहमासकुलीखांनास पंचविसा हजारा स्वारानसी काबुलेहून बोलावून घेणें व स्वता तुम्ही बाहेर निघून हे व तुम्हीं दोन वर्षेर्यंत श्रम करून दक्षaction हिंदुस्थानचा बंदोबस्त करणें. माझी गरज असलियांहि मीहि तयारच

2.1.6

Ca 51-1 आहे आणीख फौज लागेल तर पाठवीन. येसी बहूत दीलगैरमीनें पत्रें आलीं. पा(तशा)ह वजीर सफदरजंग, राजे अफजूखां, येह्याखां, मिरमुनसी यानी लाल बागांत येकांत केला. च्यार घटकापर्यंत परस्परे जाबसाल बहूत समाधान पावले. अधींच तर नादरशाह येकवचनी. जो यांसी करार केला त्यांत अंतराये तिलतुल्य केला नाहीं. आतांहि बंदोबस्त करूं इच्छितील तर साहित्य करावयास सिध आहेत. येवंच या प्रकारची पत्रें आलीं याकरितां समाधान पावले. अद्याप उत्तरें लिहीलीं नाहींत. पाहावें काये लिहीतात. दुसरें उमदुलमुलकाच्या जागिरा व तालुके कूल पातशाहजादियास जाले. अमीरखानाचे कदीम अमील होते. तूर्त त्याजवरच बहाल ठेविले आहे. सरदारानी माधोसिंगास च्यार परगणे, टोक, तोडा, मालपुरा, नेवाई अठरा लाखाची जागा, माधोसिंगासी मुकरर करून राजश्री खंडेराव होळकर यासी राणाजीकडे पाठविले; आणि रा० गोविंदराव तमाजी यांसी सरदारानी लिहीलें कीं, रा० निबाजी खाटके व रामराव मुनसी ईश्वरसिंगासमीप मार्गस्थ केले आहे. ते सांगतील त्याप्रमाणें ईश्वरसिंगास समजाऊन माधोसिंगास जागा देवणें. खावंदाची मरजी या प्राा ठैराव जाला. हें वर्तमान ईश्वरसिंगास कलले. ते समईं सेखावंताचा याचा कलह होता. हे वर्तमान पावतांच सिवसिंगासी सळूक केला. व त्यास आपले रफीकें केलें. कूल रा(ज्या)तील रजपूत जमा केले, व नवी फौज निगादास्त मांडली. राणाजीनी येक फौज भारतासंगासांगाते देऊन जाजपुराकडे पाठविलें, व कोटेवाला व शाहापुरेवाला वगैरे यानी आपळाले जागां तयारी केली आहे. राणाजीहि मागून सिधता करून निघणार. हे वर्तमान यैकून ईश्वरसिंगानी राये नरायेणदासजीस भारी फौज समागमें देऊन पुढें पाठविलें; व त्या मागून कोठेवाला वगैरे याच्या मुकाबल्यावर राजामलजीस पाठवणार होते;

2.1.7

व राणाजी निघाले तर त्याच्या मुकाबल्यावर स्वता ईश्वरसिंगानी निघावें, हे तजवीज ठैरली. इतक्यांत छ ९ सफरीं सोमवारी राजामलजीस देवअज्ञा जाली. ईश्वरसिंगास व सवाई जैपुरात ल्हाहानमोठ्यास परम खेद जाला, बलकी तमाम हिंदुस्थानास मलजीचा मातैम जाला. मोठा कर्ता माणूस होता. ईश्वरइच्छेस उपाये नाहीं. जे होणे ते तो जालें. तथापि ईश्वरसिंगाची वासना सुकलाँस सरदाराच्या नेमणुकी प्राा माधोसिंगास जागा द्यावीसी नाहीं. येक लडाई मारावी. प्रस्तुत भारतसिंग दाहा बारा हजारानसीं पुढें आला आहे. यास जोवर खंडेराव होळकर सामील जाले नाहींत तोवर जरब द्यावी. मग होता होईल तें पाहावें. येसा याचा मनोगत आहे. यास्तव राये नरायेणदास भावाची मातम न करतां दर मजल चाललेच गेले. राणाजीच्या फौजेचा * * * (भातरसिंग) जीचा दो कोसाचा तफावत राहिला आहे. परस्परें दृष्टादृष्ट होते. पाहावें कैसा प्रसंग होतो. आभयेसिंगानी बख्तसिंगास लिहीलें होतें कीं राणाजी ईश्वरसिंगावर जातात. तुम्हासहि साहित्यविषईं त्यांनीं पत्रें लिहीलीं आहेत. कुमक करणें उचीत आहे. त्यास अभयेसिंगाची वासना कीं, बख्तसिंगाने राणाजीकडे जावें, व आपण बिकानेरचे राज्य घ्यावें; व बख्तसिंगाची हेत कीं, बिकानेरचे राज्य निम्मे आपण घ्यावे, व निम्मे अभयेसिंगानी घ्यावे. ऐसा त्यांचा यांचा परस्परे मनोविकल्पसा आहे. मातुश्री गयाश्राध करून श्रीप्रयागास आली. प्रयागी मकरस्नान संपादिले. सिमगी पौर्णिमा करून देशास चालणार. बहुधा चाललीं असावीं. दोन जोड्या आमच्या प्रयागास गेल्या आहेत. आज उद्या येतील. सफदरजंगाचे दरबारी वर्तमान आले कीं, पुत्रासी अजुर्दा आहेत; म्हणून वाराणसीसीच राहूं म्हणतात. हे गोष्ट नबाबांनी आम्हास पुसली. आम्हीं विनंति केली कीं, हे गोष्ट फटकाळ आहे.

2.1.8

हें स्थलें येसी आहेत कीं, हिंदू होत असतां या स्थलास गेलियावरी क्षेत्राास सोडावे ऐसा हेत होत नाहीं. यास्तव राहूं म्हटले असेल. या गोष्टीवर लोकानी जी लबाडी केली असेल या प्राा विनंती केली. यावरी निशा जाली. परंतु जागजागां * * * वर्तमान आहेत. तथ्य वर्तमान आलिया्र लिहून पाठऊ *सेवेसी श्रुत होय बहूत काय लिहिणें. कृपा केली पाहिजे, हे विनंती.

2.1.9

[१ प्रेमानें.]

2.1.10

[२ दोस्त.]

2.1.11

[३ शोक.]

2.1.12

[४ समजुतीनें.]