Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.1.5

Selections from the Peshwa Daftar 2.1.5

Language
Marathi

2.1.5

विनंती सेवक बापूजी माहादेव व दामोदर माहादेव सां। नमस्कार विनंती. येथील कुशल ता॥ छ २४ मांहे सफर मु॥ इंद्रप्रस्थ स्वामीचे कृपावलोकने यथास्थित असे विशेष. स्वामीकडील कृपापत्रे छ ५ जिल्हेजची सरकारच्या जोडी-बराबर छ २० मोहरमी पावलीं. तेथें आज्ञा कीं, नादरशाहाकडील व दिलीच्या अमिराचें व हिंदुस्थानच्या राज्याचें वगैरे जें नवलविशेष वर्तमान येत जाईल तें लिहीत जाणें म्हणोन आज्ञा केली. जैसीयास पूर्वी नवाब उमदतुलमुलुक शांत जाले, तेव्हा मुजरद कासदांची जोडी सेवेसी राा केली; व येक जोडी दुसरीहि पाठविली. त्या दोही जोड्याबराबर या प्रांताचें साकल्य वृत्त लिहीले आहे. सेवेसी श्रुत जाले असेल. सांप्रत नादरशाहाकडील वर्तमान जैसे आहे कीं, याचा रुमवाल्याचा सल्लुक जालियांहि हा स्वदेशास परतून आला. आपल्या मुलकाचा बंदोबस्त करून प्रस्तुत येकाच ठिकाणीं काहीक दिवस छावणी करून राहिला आहे. मिर्जा नसरुला पातशाहजादा व तहमासकुलीखां या दोघास काबुलेकडे मार्गस्त केले. महमदशाहास व नवाब वजीर व नवाब मनसूर अलीखान यांस पत्रें पाठविली आहेत, जे मजला हिंदुस्थानातून येऊन आठ नव वर्षे जालीं. अद्याप तुम्ही स्वदेशाचा कांहीं बंदोबस्त केला नाहीं. परस्पेरें येकतों जे, चाकर कोण्ही चाकरीच्या मार्गें वर्तत नाहींत, आपलाले ठिकाणीं खावंद होऊन राहिले आहेत. याकारितां मुलकांत गनिमाचा गलबला विशेष आहे. म्या इतकी तुम्हांस ताकीद केली असतां तुम्हीं मुलकाच्या बंदोबस्ताचा कांहींहि प्रेत्न न केला. मजसारखा पक्षपाती असतां, सर्व प्रकारें मी तुम्हास अनकूल असतां, आज तुम्ही आपले पातशाहीचा बंदोबस्त न कराल तर कधीं करणार ? अद्यापहि कांहीं गेले नाहीं. दोन दिवस सुखावर मन न ठेवितां मिरजा नसरला व तहमासकुलीखांनास पंचविसा हजारा स्वारानसी काबुलेहून बोलावून घेणें व स्वता तुम्ही बाहेर निघून हे व तुम्हीं दोन वर्षेर्यंत श्रम करून दक्षaction हिंदुस्थानचा बंदोबस्त करणें. माझी गरज असलियांहि मीहि तयारच