Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.1.7

Selections from the Peshwa Daftar 2.1.7

Language
Marathi

2.1.7

व राणाजी निघाले तर त्याच्या मुकाबल्यावर स्वता ईश्वरसिंगानी निघावें, हे तजवीज ठैरली. इतक्यांत छ ९ सफरीं सोमवारी राजामलजीस देवअज्ञा जाली. ईश्वरसिंगास व सवाई जैपुरात ल्हाहानमोठ्यास परम खेद जाला, बलकी तमाम हिंदुस्थानास मलजीचा मातैम जाला. मोठा कर्ता माणूस होता. ईश्वरइच्छेस उपाये नाहीं. जे होणे ते तो जालें. तथापि ईश्वरसिंगाची वासना सुकलाँस सरदाराच्या नेमणुकी प्राा माधोसिंगास जागा द्यावीसी नाहीं. येक लडाई मारावी. प्रस्तुत भारतसिंग दाहा बारा हजारानसीं पुढें आला आहे. यास जोवर खंडेराव होळकर सामील जाले नाहींत तोवर जरब द्यावी. मग होता होईल तें पाहावें. येसा याचा मनोगत आहे. यास्तव राये नरायेणदास भावाची मातम न करतां दर मजल चाललेच गेले. राणाजीच्या फौजेचा * * * (भातरसिंग) जीचा दो कोसाचा तफावत राहिला आहे. परस्परें दृष्टादृष्ट होते. पाहावें कैसा प्रसंग होतो. आभयेसिंगानी बख्तसिंगास लिहीलें होतें कीं राणाजी ईश्वरसिंगावर जातात. तुम्हासहि साहित्यविषईं त्यांनीं पत्रें लिहीलीं आहेत. कुमक करणें उचीत आहे. त्यास अभयेसिंगाची वासना कीं, बख्तसिंगाने राणाजीकडे जावें, व आपण बिकानेरचे राज्य घ्यावें; व बख्तसिंगाची हेत कीं, बिकानेरचे राज्य निम्मे आपण घ्यावे, व निम्मे अभयेसिंगानी घ्यावे. ऐसा त्यांचा यांचा परस्परे मनोविकल्पसा आहे. मातुश्री गयाश्राध करून श्रीप्रयागास आली. प्रयागी मकरस्नान संपादिले. सिमगी पौर्णिमा करून देशास चालणार. बहुधा चाललीं असावीं. दोन जोड्या आमच्या प्रयागास गेल्या आहेत. आज उद्या येतील. सफदरजंगाचे दरबारी वर्तमान आले कीं, पुत्रासी अजुर्दा आहेत; म्हणून वाराणसीसीच राहूं म्हणतात. हे गोष्ट नबाबांनी आम्हास पुसली. आम्हीं विनंति केली कीं, हे गोष्ट फटकाळ आहे.