Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.11: [April 1749] To Peshwa by his agent in Rajputana : Reports that Ishwarsingh has taken offence at the support the Peshwa gave to Madhaosingh.

Selections from the Peshwa Daftar 2.11

Language
Marathi

2.11

श्री.

पुरवणी श्रीमंत राजश्री......पंत प्रधान

स्वामीचे शेवेशी

विनंति. स्वामीनीं आज्ञापत्रीं लिहीले कीं, आम्हास ईश्वरसिंगयाचे सर्व प्रकारे अगत्य. ईश्वरासिंग यासी काहीं दुसरा विचार नाहीं. ऐसे असोन जे करणें ते त्याचे हितावह व लौकिकास उचित आणि बहुत दिवस केलेप्रमाणे चाले तोच अर्थ योजून सरदारास लिहिणें ते लिहिले आहे. तेहि हेच गोष्टीवर कायम आहेत. दुसरा विचार करणार नाहीं. मलजीनी या गोष्टीचा संशये चित्तात न आणावा. सरदार सांगतील त्याप्रमाणे निकाल काढून, कलह तोडून, निकालसता करून टाकावी हे उचित असे. त्यास न कलेसे काय आहे? सांप्रत ईश्वरसिंगजी काय करितात? सर्व किरकोल व मोठे वर्तमान तुम्हाकडून वकील आहे त्यास लिहून तो वरचेवर येथे लिहून पाठवी यैसे करणे म्हणून पुरवणी पत्री आज्ञा केली. याचप्रकारे येकदांनदां सरदारानींहि लिहा. स्वामीचे मर्जीनरूप व सरदाराच्या लिहिल्यानरुप आम्ही जैपूरकरास वरचेवरी पत्रे लिहिली. व गोविंदराव तमाजीकडून जे प्रत्यक्ष सांगावयाचे ते सांगविले. त्यानीं हेच उत्तर दिधले कीं हे गोष्ट यथार्थ. त्याचा आमचा स्नेह अलोलिके व पिढीजाद आहे. महाराज वैकुंठवासी व श्रीमंतराऊ कैलासवासी यासी कोण्या प्रकारे इष्टत्व निभलें, महाराजानीं काय काय कामे श्रीमंताची केली, हे बाळाजीरायाच्या ध्यानांत नाहीं यैसे नाहीं. आताहि आम्ही सर्व प्रकारें त्यांच्या वचनावेगले नव्हतो. परंतु हा दायादांचा विचार आहे. त्याजमध्ये आम्ही राजे लोक. जे वंशपरंपरेने चालत आले असेल तेच केले पाहिजे. हा भुमीचा कजिया आहे. कसा देववतो? चाकरीच्या नात्यानें जे सरदारानीं पूर्वी देवविले ते दिधले आहे. आधिक द्या म्हटल्यास विनायुद्ध कसे अनकुल पडतें? सर्वा राज्यांत कनिष्ठास विभाग देऊन आपल्या आगीं कपुतेंपण व नामर्दी कशी घेवते? असो श्रीमंत स्वामीचा व सरदाराचा हाच हेत. त्यास पहिल्यापेक्षां विशेष देववायाच आहे तर हे तो घडणे नाहीं. राज्य ईश्वराचे देणे आहे. ज्यास ईश्वर देईल तोच घेईल. परंतु पगडी बदलली. त्याची फलश्रुत इतकीयातच दाखविली. असो जे त्याणी केले असेल तेच उत्तम जाणूनच केले असेल. यैशी हटनिनृहाचीच उत्तरें युद्धापूर्वीच देत होते. अंती युद्धच करून आपला लौकीक केला. त्यास सवाईजीचा पुत्र

[१ अमोलिका, अलौकिक?]

[२ कुपुत्रता.]

Ca 51-3 अंबेरचे घराणे हमेशा राणा राठोड हाडे यासी छकड देत आले असतां, त्याची छकड ईश्वरसिंग खातें यैसेहि तो नाहीं. ज्याचे घरांत आजी कछवा हाच लाखी माणूस दुसरे सवाइजीपेक्षां हे रजपूतीची टेंक राखत असताहि स्वामीच्या घरास आपलेच घर जाणत होते; समयास यांणीं जे कामे केली ते दुसऱ्यानें केली न केली; हे हि स्वामी जाणतच आहेत. असो, जे होणार ते जाले. बदनक्षी बहुत जाली. पुढें पहावे काय काय होते. ईश्वरसिंगांनीं झाडून फौज एकवट केली व करितात. सरदाराचा वसवास. या करितां मुलूक उजाड करविला. सरदार कालपी जवळ आहेत. शेवेशी श्रुत हे विनंती.

Discussed in (1)