Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.12: [19-6-1749] This and the following seven letters, all in the hand of Ramchandra Baba, addressed by Jayappa Sindia to the Peshwa from his return-journey to the Deccan from Delhi. The Sindia and the Holkar had accompanied the Peshwa in his previous year's expedition to Delhi. The Peshwa had an interview with the

Selections from the Peshwa Daftar 2.12

Language
Marathi

2.12

श्री

पोो ८ साब़ान.

सेवेसी विनंति उपरि. दिलीकडील वर्तमान पातशाहा वजीर फेरोजंग इतजामत दौला हे दिल्लींत आहेत. मिरमनु लाहोरेस आहेत. ईरानीदुरानी परस्पेरें विमनस्क आहेत. मकसुदाबादवाला यथास्थित आहे. राजे अभेमिंग, राजे इश्वरसिंग, राणाजी व हांडे आपापल्या मकानीं आहेत. नवल विशेष लिहिनेस नाहीं. आम्हीं येथील गुंता लोकांचा उरकल्यावरी सेवेसीं येऊं. विदित जाहालें पाहिजे हे विज्ञाप्ति.

## 12a

@D [19-6-1749

पौो ८ साब़ान.

श्री.

सेवेसी विनंती उपरि. होलकर येऊन राजश्री विठल सिवदेव, राजश्री अंताजी माणकेश्वर यांकडील बंदोबस्त जेथवरी जाहला तेथवरी कांहीं झणी बसऊन दिल्हीं. राणा जाट व नरवरकर याची खंडणी वसुलाचा निर्वाह करविला. तेथून शाहाबाजेस आलों. तेथील खंडणीचा वसुल घासदाणा बारा हजार केले. तेथून खिचीवाड्यांत आलों. निमे वसुल तूर्त व निमेचा वाईदा करून तेथून उजेनीकडे यावें तों नासरजंग अकबारपूरच्या घाटास येऊन पोहोचले. तेव्हां ते गोष्टीचा विचार केला पाहिजे. यास्तव मकुंददऱ्याच्या सुमारें कोठ्याकडे पंधरा रोज राहिलों; तों नासरजंग माघारे गेले. आम्हीं येऊन उजेनिस दाखल जाहालों. सेवेसीं श्रुत होये हे विज्ञाप्ति.

## 12b

@D [25-6-1749

पो ८ साबान

श्री.

श्रीमंत राजश्री......पंत प्रधान.

स्वामीचे सेवेसीं

विनंति सेवक जयाजी सिंदे कृतानेक विज्ञापना. तागायत छ २१ रजब मुकाम उजेन स्वामीच्या कृपावलोकनें सेवकाचें वर्तमान यथास्थित आसे विशेष. स्वामींचें आज्ञापत्र आलें, तेथें आज्ञा कीं कोठें आहां? काये मनसुबे करितां? देसीं कधीं येणार? सत्वरी दर्शनास यावयाविसीं आज्ञा केली. त्यासी आषाढ शुध पौर्णिमा जालियावरी द्वितीयेस उजेनीस आलों. लोकांचा रवानगीचा गुंता उरकला पाहिजे. येदा अर्जबाब देखील लोकांस न पावली. लोकांची कटकटहि पडली आहे. येवज करून लोकांची रवानगीचा निकाल करून सेवेसी येत़ों सेवेसी श्रुत होये हे विज्ञाप्ति.

## 12c

@D [1-7-1749

श्री.

विनंति सेवक रामचंद्र मल्हार कृतानेक विज्ञापना. तागायत छ २७ रजब मुकाम उजेन स्वामीच्या कृपावलोकनें सेवकाचें वर्तमान यथास्थित असे विशेष. राजश्री हरि विठल याणी स्वामीचे आज्ञेप्रमाणें चाकरी उत्तम रीतीनें केली. परस्पर सेवेसीं विदित जाहलीच आहे. प्रस्तुत धारेस राजश्री राघो केशव गेले. आण मशारनिले यासी सेवेसी रवाना केलें आहे. या प्रांतींचें व आपले वृत्त विदित करितील. कृपाळू होऊन सर्व प्रकारें ऊर्जित करावया खावंद समर्थ आहेत. सेवेसीं श्रुत होये हे विज्ञाप्ति.

## 12d]

@D [1-7-1749

श्री.

सेवेसीं विनंति उपरि. उजेनिस आल्यावरी लोकांचा गवगवा उदंड पडला. कां कीं, दुसाला लोकांचे राहणे यामुळे कर्जदारिहि जाहले. वोडीं पडलीं. कितेक गवगवे अर्जबाब रवानगी हे तो जरूर दिल्हे पाहिजे. त्यासच पैका जथल्यांविना निर्गम होत नाहीं. कमाविसदार जमा करून वाट करून लोकांची समजाविसी काढून सेवेसी येऊं. नवल विशेष या प्रांतींचें वृत्त ल्याहावेसें नाहीं. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञाति.

## 12e]

@D [19-6-1749

पौ ८ साबान

श्री.

विनंति उपरि. नवाब वजिर याणी कितेक गोष्टी बोलल्यात आल्या होत्या; आणि नासरजंग दिलीस गेले, आम्ही उगेच राहिलों तर आमचाहि आब न राहे, आण पुढें ते कधीं आम्हास सुद पडों देणार ? यास्तव यासी कटकट करावीच परंतु आपल्याच मुलकांत जुझल्यानें खराब मुलुख होईल, यास्तव राणाजी अथवा कोटेवाल्याच्या तालुक्यांत कटकट करावी. यास्तव कोठ्याच्या तालुक्यांत पंधरा रोज राहिलों. तो नासरजंग माघारे गेले. त्याचा, आमचा व दिलीचा सर्वो गोष्टींचा भ्रम राहिला. उत्तम जाहालें. सेवेसी श्रुत होये हे विज्ञप्ति.

## 12f]

@D [1-7-1749

पो ८ साबान

श्री.

सेवेसी विनंति उपरि. दिलीकडील राजकारण यथास्थित राहिलें आहे. नासरजंगहि दीर्घदृष्टीनें गेले. यामुळे हाहि प्रसंग यथायुक्त राहिला. वरकड बुंधेलखंडातील जें यथाज्ञानें खावंदाच्या तेजप्रतापें घडोन आल्यानरूप कार्य केलें. वरकड राजश्री मल्हारबा आम्ही तीन च्यार महिने येक जागां आज्ञेप्रमाणे राहिलो.

[१ मिळाल्याशिवाय.]

येथाकदाचित रंगच राहोन उजेनिस आलों. ते इंदुरास गेले. सविस्तर कळावें यास्तव विनंति लिहिली आहे. सेवेसी श्रुत होये हे विज्ञाप्ति.

## 12g

@D [1-7-1749

पो ८ साबान.

श्री.

सेवेसी विनंति उपरि. आज्ञा पत्र आलें. त्यांत लिहिलें कीं, कांहीं वर्तमान कां लिहित नाहीं ? येसियासी जे कार्य जेव्हां करणे त्या आगोधर सेवेसीं विनंति लिहित गेलों. तें कार्य जाल्यावरी विनंति लिहित गेलों. कागद न पावले म्हणावे तरी जाबहि येत गेले. येक गोष्ट आहे कीं येथील विनंति पत्रीं मार्गी असतां आज्ञा पत्र आलें असेल. आम्हीं तो आज्ञा पूर्वी केल्याप्रमाणे सविस्तर लिहितच आहो. सेवेसी श्रुत होये हे विज्ञाप्ति.