Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.116: [1-2-1760] Gangoba Chandrachud addresses this letter to the Peshwa in his own hand and asks him to follow the advise of Holkar in the struggle against Abdali.

Selections from the Peshwa Daftar 2.116

Language
Marathi

2.116

श्रीमोरया.

पो. छ १३ जमादिलाखर.

श्रीमंत स्वामीचे शेवेसी.

कृतानेक सां. नमस्कार विज्ञापना. स्वामी हस्ताक्षर आज्ञापत्र पाठविले ते पाउंन अमृंतोल्हास जाला. ताा पुंस वद्य १ मुा. झीलाये सेवकाचे वर्तमान यथास्थीत असे विज्ञप्ति. माधोसिंगाने बहूत कृतघ्नता केली. थोडसें पारपत्य जाहालें. पुतें पारपत्य करावें तों राजश्री जनकोजी सिंदे व राजश्री दत्ताजी बावा पाटील यांचे पत्रें आली. आबदालीची दाटी फार जाहाली आणि नजीबखानाची गांव लढाई केली. आणि साबाजी सिंदा आवई ऐकुन पळाला तो तहद लस्करास अंतरवेदीतच आला. ठाणें सरहंद वगैरे होती तेथे दम न धरिला. तेणेकरून आबदाली सेर जाहला. नजीबखान आबदाली येक होणार, चौकडून माधोसिंग व मुसलमान यांचे कान आबदालीकडे. यैसे बहूत जड दिसतें. परंतु राजश्री सुबेदार येकनिष्ट खावंदाच्या (पा) यासी तेणें करून कांहीं चिंता नाहीं आ (पले) प्रतांपेंकरून पराभवाते शत्रु पावे. (फी) कीर नाहीं. राजश्री सुबेदार यांची (दुरं) देशी बहूत. यांच्या तजवीजने वर्तणुक केलिया मनसबा धको पावत नाही. शरमीने हरयेक गोष्टीनें मागे बारीक दृष्टीने याचे मनोधारण राखणार स्वामी समर्थ आहेत. आवंदा फौज मातबर विशेष ठेविली. सर्व निर्वाह करणार स्वामींचे पुण्य आहे. मुजपरगाडदीयाने विस्वासघात केला होता. चांडाळास नतिजा देऊन मारून टाकिला. येणें करून बहूत संतोष जाहला. स्वामी पुण्येश्लोक आहेत. तेथे काये होणे आहे! परंतु ईभरामखान गाडदी निजामआलीकडील ठेविला आहे. त्याचाही विश्वास अतिनिकट धरीत न जावा. स्वामी तो सुज्ञ आहेत. राजश्री सुबेदार व राजश्री सिंदे येकत्र करितो. येकत्र जालियावर साहेबकाम उत्तम होईल. कर्जा बाा कार्तिक मासचा वाइदा बहूत प्रयत्ने केला कीं स्वामीस सचोटी यावी. वरकड सदैव सेवकाचा सांभाळ करणार स्वामी समर्थ आहेत. सेवेसी श्रुत होये हे विज्ञापना.

[१ होळकराची शरम किंवा मान ठेवून.]