Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.115: [25-1-1760] This mutilated letter seems to be from Malharrao Holkar to the Peshwa.

Selections from the Peshwa Daftar 2.115

Language
Marathi

2.115

श्री मोरया.

× छ १३ जमादिलाखर.

सेवेसी विज्ञापना. इकडील वृत सर्वदा पत्री लिहिले आहे. पूर्वी लाकोडेस रांगड्याची फौज च्यार हजार व पायेदळ जमा होऊन त्यास मारून लुटून पस्त केले. जोतेसिंग नाथावत व राजावत व सेकावत व चव्हाण वगैरे वीस सरदार मारले गेले. त्या दिवसापासून रांगडा कोणी जमाव करून बाहर निघेनार्से जाले. जागा जागा थांगा धरोन राहिले. पूर्वी राजश्री जनकोजी सिंदे याजकडील पत्रे आली होती. त्यावरून आम्ही तोफखाना माघारा लाऊन सडे होऊन दरमजल त्या प्रांतास जात होतो. तेणेकडून रांगडे बहुतच वारा प्याले. 'आम्ही व पुढील फौजा जे दिवशी एकत्र जालो तेच दिवशीं राजश्री जनकोजी सिंदे याजकडोन पत्रे आली. त्यात गिलज्याकडील बहुतसी गर्मीचा मजकूर नवता, आणि इकडील रागडीयांनी जमाव करून * * * *

(पुढील मजकूर फाटला आहे).

[१ रफीक = दोस्त स्नेही.]

[२ ताले सिकंदर = उच्चग्रह.]

Discussed in (1)