Selections from the Peshwa Daftar 2.118: [5-3-1760] This letter of Raja Keshavrao addressed to the Peshwa gives valuable details of the political situation in the North created by the presence of Abdali: The devastations of Scindia's forces and the flight of the Emperor's Son. "The fate of India now hangs on Malharrao."
Selections from the Peshwa Daftar 2.118
- Language
- Marathi
2.118
श्रीकृष्णोजयेती.
श्रीमंत महाराज राजश्री पंडीत प्रधान बालाजीराव नाना स्वामीचे शेवेशी.
(राजे केशवराव ?) राव साष्टांग नमस्कार विनंती उपरी. येथील क्षेम तागायत छ १६ रजव मुक्काम झांसी जाणून स्वकुशल लेखनाज्ञा केली पाहिजे विशेष. पूर्वी विनंतीपत्रे अबदाली व राजश्री मलहारराव होळकर सुबेदार व राजश्री जनकोजी शिंदे सरदाराचे वर्तमानाची वरचेवरी पाठविली असेती त्यावरून सर्व विदीत जालेच असेल. सांप्रत राजे माधवसिंगापासी अबदालीचे येलची गुरबक्षराये व हरजसराये व महताबराये दिवान नजीबखान रोहिलाचा जाबसाला कारणे आले आहेत. माधवसिंगानें सिष्टाचार करून कांहीं कापड व जवाहर व सलुकाची लिहिली अबदालीस पाठविली असतां त्यानें कबूल न केली. मार्गीहून वस्त्रे व जवाहर परतून माधवसिंगापासी पाठविले. व पैगाम पाठविला कीं भेटीस येणे. नाहीं तरी मातबर माणूस व फौज पाठवणे व पैकाहि विशेष मागणार याजवरोन राजे मजकूर विचारांत पडले आहेत. आबदालीचे कौलाचा येतबार नाहीं. प्रस्तुत अबदाली जैपुराहून ४० चालसा कोसावरी बासईवरी मेवातप्रांती आहे. व मलहारराऊ होलकर * * * * प्रांती आहेत. कानोडीहून दहा हजार रुपये दाणा घास घेऊन सडी फौजेनें आहे. मुकाबिला काबू पाहून करितील व अबदालीनें कढके खोबरी वगैरे राजे माधवसिंगाचा मुलूक मारून कत्तल केला. काहीं पातशाही करायाची रीति व ढंग नाहीं. जरी कौल नीट असतां तरी सर्व राजे जाऊन भेटते. परंतु मुकाबिला घेण्यासहि हिंमत कोणात नाहीं. अबदाली परतूनहि जाणार परंतु नजीबखान व सर्व रोहिले त्यास जाऊ देत नाहींत कीं तुम्ही गेलियावरी मऱ्हाठे सरदार आम्हास राहू देणार नाहींत. याजकरितां त्याचे तजविजेनें अबदाली आजमेरेस जाणार. व तेथें गेलियावरी व राजे राठोड व राणा व बडे व कच्छवा हे रुजू होतील. मग जे करणे ते करावे. किंबहुना रोहिले यासी संकट व तजवीज असी आहे कीं, प्रजन्यकालहि अबदालीनें या प्रांती करोन दसरा जालियावरी दक्षण व गुजराथेकडे जावे. परंतु अबदालीचा जुळूम फार व कौलाचा नीट (नाहीं) * * * * त्याचे राहावयास राजी नाहींत. हे दीर्घ रोग आहे. लाहोर व दिल्ली हे दोन्हीं मुलूक तरी खराब जाले. आतां आजमेर पुढें कोणे थरास जाते पहावे. महाराजाचा प्रताप सर्व विश्व इच्छित आहे. मोगलाची पातशाही दिल्लीची तो शेवटास आलीशी दिसते. नांवास पातशाह जादा आली गोहार पट्टणीयास पाऊन तेथील राम नारायेण सुबे याचा नायेब होता त्यास जुंजात जखमी केले. फौज लुटली. व तो पलोन गेला. व पातशाहजादा तखतावरी बसला. त्या प्रांती पठाण व जमातदार मिलोन वीस हजार स्वार त्याजबरोवर आहेत. गुजरान लुटीवरी असे. सुजाउद्दौलास आबदालीनें बोलाविलें व पातशाहजादियासहि बोलाविलें आहे. शुजाउद्दौलास अबदाली पैका फार मागतो. तोहि भयास्तव त्याजपाशीं जायास अनमान करितो. त्याप्रमाणें अहंमदखान बंगरश व सुरजमल जाठ यास पैगाम आला असतां जाबसाल वरच्यावरी * * * * व सरदार व अबदालीचा निवाडा काये होतो याचा हि मार्ग * * * * (पाहत) दोहीकडे सलूख ठेवितात. परस्परे इतमाम करून मारिते तरी अबदाली व रोहिले दोघासहि समजाविते. महाराजास चहूकडून वर्तमान पावतच असेल. जे पारपत्य करायाचे व फौज वरचेवरी सरदाराचे कुमकेस पाठविणें ते पाठवितील. ज्यापक्षीं धण्यातून कोणास पाठवावयाचे असले तरी सामान भारी असला पाहिजे. तोफखाना सिंदीयाकडील तिकडे गेला व अबदाली व रोहिलीयाकडे तोफखाना फार; त्यांत रोहिलीयापासीं बाणाचा सामान बहुतच आहे. अशे कामास फिरंगीयाचा तोफखाना जरूर
[१ पत्र गंगाधर यशवंताचे असावें.]
192 असला पाहिजे. आम्हास सुचले ते विस्तार लिहिल्यावाचोन राहावेना. अंतरवेद व बुंदेलखंड व मालवा धरून कमाविसदार अबदालीचे भयास्तव सुचितें नाहीं. सर्वांची नजर मलहार . . . . . स्वस्थ अबदालीचा काये निवाडा होतो याजवरी असे. हे विनंती.
पैवस्ति छ १३ साबान सन सितैन.