Selections from the Peshwa Daftar 2.119: [Pre-Panipat-Peshwa Balaji Rao] This paper appears to contain the Peshwa's orders for writing letters to several officers who were proceeding to the North with Bhau Saheb. The wounds referred to in the case of Damaji Gaekwad must have been those he received in the Udgir fight.
Selections from the Peshwa Daftar 2.119
- Language
- Marathi
2.119
श्री.
यादी तेथील सरदारास पत्रे.
किं॥
१. बापूजी नाईक व अबाजो नाईकास पत्र कीं, पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. सविस्तर लिहित जाणे. बहुतां दिवशीं मातबरे झुंज पडलें. श्रीकृष्णें विशेष कामकाज होऊन आलें. येणेकरून बहुत संतोष जाहला.
१. समशेर बहाद्दरास पत्र कीं, तुम्हास बुद्धिवाद रगडून लिहिला. तुम्ही जाऊन दोन वेलेस कामकाज विशेष केले. येणे करून संतोष जाहाला. तुम्हाजवलून हमेशा सर्वां-हून मेहनत मर्दुमकी अधिक व्हावी यांत आम्हास बहुत संतोष.
किं॥
१. बाजी हरीस पत्र कीं तुमचें पत्र येऊन वर्तमान कळले नाहीं. जखम बरी जाहाली किंवा नाहीं ते लिहिणें.
१. सदाशीवपंत पागा यासहि बाजी हरी प्रमाणें.
१. विसोबा बिनी. तुम्हाकडून पत्र आज यावें. येऊन वर्तमान कळले नाहीं. सविस्तर लिहिणें. सत्वर जाऊन आधीं सरहद्दीकराचे पारपत्य करणें.
[१ स्वस्थ.]
१. सदाशीव रामचंद्राम पत्र कीं तुम्ही गेलिया तागायत पत्र पाठविले नाहीं. तुम्हाकडील लोकांचें व स्वता कामकाज विशेष जाहालेंच असेल. सविस्तर वर्तमान लिहिणें.
१. ये यशवंतराव पवारास पत्र कीं पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. यंदा स्वता मेहनत मर्दुमकी विशेष केली हें वर्तमान श्रवणे संतोष जाहाला. तुम्ही सर्वांहून अधिक करावें. योग्यच आहे.
१. सोनजी भापकर व शहाजी भापकर यास यशवंतराव पवाराचे पत्राप्रमाणें पत्र.
१. दमाजी गाईकवाडास पत्र कीं जखम अगदी बरी जाहाली किंवा नाहीं. यंदा स्वता कामकाम उत्तम केलें. तर ह्या गोष्टी योग्यच आहेत. कनिष्ठपक्षीं पांच सात हजार फौज असावी. कामकाज विशेष व्हावें उत्तमच आहे.
१. द्वारकोजी राऊ पाटवणकर खंडेराव दरेकर यास पत्र कीं तुमच्या जखमा बऱ्या जाहालियाचे वर्तमान लिहिणें.
हरबा
रायाजी पवार
विठ्ठल सिवदेव.