Selections from the Peshwa Daftar 2.13: [23-6-1749] Hingne from Delhi to Peshwa at Poona. Reports Nasarjung's plans at the Emperor's Court.
Selections from the Peshwa Daftar 2.13
- Language
- Marathi
2.13
श्री.
छ १९ रजत्र
पुरवणी श्रीमंत राजश्री......पंत प्रधान स्वामीचे सेवेसी.
विनंति येसिजे. नवाब निजाममुद्दौले नासरजंग यानी हजूर यावयाचा बया केला तो जाहीरदारींत तों पातशहाचे कदम पहावयासी यावें, आणि सलतनतीचा बंदोबस्त करावा, हेच मात्र माझी आरजु आहे; आणि विजारत इंतजामुद्दौलाची इंतजामुद्दौलास द्यावी, आणि सफदरजंगास काढून द्यावे, हे तो भावाबंदास लिहितात. सफदरजंगापासी मखंदी वकील आहे त्यास लिहितात जे, मजला महज (?) एक मऱ्हाटी याची तंबीहि करणें आहे. यासी मी हजूर येतो. तुम्ही आम्हावर तवजें करून दक्षिण बाहाल करवावी. आणि मीरबक्शीगिरी जुलफकारजंगानीं घेतली. ते मात्र अम्हास देवावी. तुम्हीं आम्हीं एकचित्त होऊन सलतनतचा बंदोबस्त करावा. त्यासी हिंदुस्थान आवघी बालाजीरायानीं आटोपली आहे. त्यास हे बेइमान येसे आहेत. तुम्हीं याचे भरवसियावर जाल तर दगा खाल. हैं दगा देतील. एक रुपयाचे यास अशनां आणिक कोणीही गोष्ट मठ (ह) नजर नाहीं. तुम्ही मशीं कौल आहद करून बालाजीरायाचें तंबीचीच तजवीज करावी. म्यां तुमचे ताबेदार असावे. हे पत्रे बजिन्नस नवाबाही आम्हास दाखविली. नवाबाही सांगितले जे बालाजी- रायाचा विश्वास जैसा लिहितात, जैसा असिला तर मी नासरजंगासच स्नेही करीन. मग तुम्ही शब्द न ठेवावा. आम्ही विनंति केली. दुरुस्त नवाब म्हणतात. परंतु नवाब या दुराण्याच्या पाचा पेचास वाकफ नाहींत. पातशहास त्याप्रमाणें लिहितो; भावास त्याप्रमाणें लिहितो; नवाबास याप्रमाणें लिहितात. ते महज (?) येवढें गोष्टीं करितां जे नवाबासी बालाजीरायासी स्नेह याकरितां एक बसवास आहे. त्यासहि शत्रू केले म्हणजे एकच नवाबास केले. नवाब बोलले जे जर बालाजी रायाची आमची सत्य स्नेह आहे तरी सरदारांहीं आडवे नासरजंगास व्हावे; तुम्ही जाऊन या गोष्टीचा पका विचार करा. मीं खर्चासहि देतों. जर तुम्ही हैं न केले तरी पन्नास हजार स्वार मजजवळहि आहेत. चहूंकडून फौज एकत्र जाली तरी एकदा पाहिजे तैसी लढाई करीन. स्नेहाची परिक्षा याच समई आहे. आम्ही मतलब लिहून दिधले, त्यांत कांहीं मंजूर कांहीं नामंजूर केलें. येथून ठीक करून सरदारांजवळ गेलों. तेथील विचार पाहिला तो नासरजंगाची बिघाडा- याची मर्जी न देखली. त्यांनीं म्हटले जे रामेश्वरापासून दुराणी अटकेपर्यंत असे- ती यासी पातशहासहवर्तमान बिघडल्यानें परिनाम उत्तम नाहीं; आणि नवाब वजिरास नाहीं म्हणता न येत. यास्तव जैसे मतलब लिहिले जे, हे करूं न सकेत ते मतालंब परभारे नवाबास कळले. त्यावरून बहुतच बर्हम जाले. मुख्य गोष्ट यासी स्वामीच्या स्नेहाचा भरंवसा होता. तो सरदारांच्या बोलन्यावरून पुचसा (पुष्कळसा) कळला. निगादास्त ज्यारी आहे. नवलरामास वगैरे चहूंकडून फौजा बोलाविल्या. पातशहा जाहीरदारींत यासी म्हणतात; शुके मनाईचे नासरजंगास लिहितात. परंतु अंतस्थे बोलावितोत. त्यास पातशहाचे ह- रद्व मनास आणितां हेच जे, यांचा दबाव त्यास त्यांचा दबाव यासीं दाखवून दोघांचा परस्परे स्नेह करून एकास मीरबकसीगीरी, एकास बिजारत देऊन, त्याच्या जांगिरा देऊन, आजमेर, आगरे, इलाहाबाद या सुभेदाराच्या फेरोजंग, इंतजामुद्दौलेयासी द्याव्या; आणि बाहेर निघून रजपूत वगैरे सर्व मिळऊन बंदो- बस्त करावा. त्यासी बंदोबस्त म्हटल्यासी स्वामीचाच; आणिक कोणता बंदोबस्त आहे? ये समयीं फौजा हिंदुस्थानांत स्वामींच्या नाहींत. सरदार उलटे दक्षफेस चालले. येथील हद्द या प्रो झाली. ईश्वरसिंग कोटेवाले यांणीं नासरजंगाकडे जावयाची तयारी केली आहे. महाराजे ईश्वरसिंग यानीं बुंदी वगैरे जिला माधोसिंगास देविला, तोही उठवावा, कमाविसदार उठवून द्यावे, या गोष्टींत परवर्तले आहेत. त्यासी हे सिवाये नासरजंगाचे वलगने वेगले करीत नाहींत. दुराformियाचे साहित्य केले नाहीं, त्याकरितां दुराणी अजुर्दा सफदरजंगास साफ जाबपेक्षां अधिक मतालब वातले असतां, तो अजुर्दा मथुरेसंनिध आले असतां, पातशहास काये काये उमेद सेवेसी दाखवून, सफदरजंग वगैरे सर्व बाजिद असतां निघून दिधले. तैसेच नासरजंगाचे हे मनोरथ स्वामीच्या प्रतापे पूर्ण होतील. स्वामीच्या पुन्यें प्रतापे करून नासरजंगास इत्के करून नासरजंग हात चोळीत म्हणेत जे बाळाजी रायाचे वकिलानीं मजला हजुरांत खंफीद केले. नाहीं तर सलतनचा एख्तियार माझा जाला होता. असो; आमलात येईल ते खरे. परंतु स्वामीनीं खासा स्वारीची तयारी होऊन दसऱ्यादिवाळीपर्यंत तरी मजल दरमजल चालने होय, तो अर्थ करणार स्वामी समर्थ आहेत. सेवेसी श्रुत होय. बहुत काय लिहिणे. कृपा केली पाहिजे हे विनंति.
[१ बाह्य देखावा.]
[२ मक्तेदारी.]
[३ कृपा.]
[१ खिन्न.]