Selections from the Peshwa Daftar 2.14.5
Selections from the Peshwa Daftar 2.14.5
- Language
- Marathi
2.14.5
विज्ञापना ऐसिजे. रजवाडे भूमिया लहान थोर याची नजर फिरली. आधींच स्वामीची फौज न आली. दिवसगत आम्हां मामलेदारांस लागली यांजमुलें मनास येईल त्या खबरी उठाविल्या होत्या. हल्लीं नवलराये मारले गेले. दिल्लीहून वजीर बाहिर निघाले. हेंहि सर्वानी आईकोन आतीशयेंग करूं लागले आहेत. त्यास स्वामींचें येणें उत्तम. दुसरे वजिरावर येऊन मसलत पडिली आहे. या समयीं स्वामीची फौज येऊन वजिराची मदत जालियासी वजीर स्वामीचा पाडाव होईल जर करितां पठाणासी लडाई पडिली, वजीरशाही......तर तमाम सर्वांचें सूत्र कमरदीखान याचे पुत्राचे व गाजदीखान व तमाम मोंगल व पठाण याचे येक आनुसंधान आहे. तेव्हां नासरजंगाचा पक्ष भारी पडेल. वजीर्र कायमे आहे आणि स्वामीनी वजिराची मदत केलियानें सर्व स्वामीची पातशाही आहे. त्यास स्वामीस दक्षिणेंत कामकाज पडिलें आसिलें तर हें कार्य मातबर. या कार्ये जाहालियास सर्व कामें साधतील. त्यास स्वामीचें येणें न होये. सरदारास पाठवावें. त्याचें येणें न होये तर दाहा हजार फौज कोणी मातबर पाठवावे. आम्ही मामलेदार दोघे तिघे आहो. स्वामीचा नक्ष राखोन परंतु या कामास तिलमात्र विलंब न करावा. विलंब जालियास आटोपतां मुसकील आहे. या प्रांतीं सालगुदस्तां पाणी आषाड श्रावण मासीं बहुत आतीशये लागला. तेणेंकरून खरीप बुडालें. हस्ताचें पाणी या प्रांतीं येकवार न लागलें. मोहोष्टहि लागावी तेहि न लागली. येणे करून रखीहि बुडाली. इतकें आसोन धान्य स्वस्त जालें. त्याजला कोणी येकवार घेत नाहीं. त्याजमुळे रयेत बहुत हैरण जाली. पेरले बीज रखित उपज जाली नाहीं. तमाम पाटील.........मोठी हैराणगत.........तेव्हां गांवेंगाव पेवे वाढून ठेविली. सालमजकुरीं आषाड श्रावण पावेतों पाऊस लागला नाहीं. तेणेंकरून खिरिफ बुडाले. हलीं श्रावण वद्य अमवशेस पाणी लागलें आहे. या प्रकारें वर्तमान आहे. सारांश हा प्रांत स्वामीचा भारी आहे. इकडील माणूस मोठें बेईमान.........देसी आहे. त्यास स्वामींनी इकडील सत्वर सावधानी करावी. हे वर्तमान तें लिहिलें आहे. वरचेवर होत जाईल तें लिहित जाऊन. साल गुदस्तां निमे वसूल जाला नाहीं. मागाहून जें वर्तमान होत जाईल, ते सेवेसी लिहून. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.