Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.148: [24-2-1761] Kashiraj Shivdeo informs the Peshwa how through the good offices of his master Suja-ud-dowla, the dead bodies of Vishwasrao and Bhausaheb were recovered after great effort and cremated with proper ceremony. The whole letter is in the writer's hand, who seems to be a Deccani Brahmin in the employ of

Selections from the Peshwa Daftar 2.148

Language
Marathi

2.148

श्रीसांब शिव प्रां.

श्रीमंत राा पंत प्रधान स्वामीचे सेवेसी.

पोा काशीराज शिवदेव दिा नवाब शुजाउदवला कृतानेक सांा नमस्कार विज्ञापना येसीजे : येथील कुशल जाणून स्वामीहीं निजानंदवेभवलेखनास आज्ञा करित असले पाहिजे विशेष. येथील प्रसंग आपले सैन्यांचा व गिलज्यांचा मुकाबिला होता. कालचक्रानुसार विपरीतार्थ निदर्शनास आला तो परस्परें सौा विनंती जाली असेल. येजमानांचा आपला स्नेह अविछिन आक्रिन्त्रीम आहे तोच आहे. अगतीकत्वें येणे जालें. यथाशक्य सोरस्यास मनोदये होता, परंतु भगवतसत्ता यैसीच होती. त्यास उपाये काये. जुंज मोडलिया महामारी येवनेच्छा विपरीतभावे होती. त्यास आम्ही ब्राह्मण व आपले सेवक असतां असा अर्थ व्हावा हे अनुचित जाणून येजमानांस बोध करून महतायासें श्रीमंत भाऊसौा व श्रीमंत रावसौांची शवं रणांगणीहून आणून ब्राह्मणमंडळीचे सहित चंदनादि उपचारें संस्कार केला हेहि त्यांचेंच पुण्यसहाये जालें कीं यैसा योग जाला असतां संस्कार येथाविधि जाला. जे शर्तमर्दीची ते केली का नसे आपले आंश होते. येजमानांस या प्रसंगामुलें बहूत खेदावह जाले. स्वामीराजांसहि परम दुखावह होईल. परंतु भगवत इच्छेस उपाये काये. स्वामी सर्वज्ञ आहेत. विज्ञापना करावी यैसा अर्थ नाहीं. सेवकास दासवर्गात जाणून सदैव आज्ञापत्रीं सनाथ करित जावें. बहूत काये लिहिणें. कृपा निरंतर आसो दीजे हे विज्ञापना. माघ कृष्ण १२ मुाा दिली.

Discussed in (1)