Selections from the Peshwa Daftar 2.147: [8-7-1761] The writer Dado Hari (?) writes to Nana Phadnis how shocked he was to hear the news of the Peshwa's death and sends his condolences.
Selections from the Peshwa Daftar 2.147
- Language
- Marathi
2.147
श्री.
श्रीमंत राजश्री नाना फडनवीस स्वामीचे सेवेसी.
आज्ञाधारक दाँदो हरि चरणावरी मस्तक ठेऊन स॥ नमस्कार विनंती. त॥ छ ५ जिलहेज पावेतो जंजिरे विजयदुर्गी क्षेम, असों विशेष. स्वामीचे दर्शनाची मोठी उत्कंठा लागली आहे. श्री पूर्ण करील तो सुदिन. प्रस्तुत यावयास सिध जाहालो. निघालो तो थोरले वर्तमान अवतार समाप्त जाहालियाचे आले. तेणेकरून सर्व शोकार्णवी पडलो आहो. केवल कैलासच कोसळलेसे वाटते. येशास स्वाक्षरामृतवर्षणे संजीवन करणार आपण खावंद आहेत. कधी आपले चरण दृष्टीस पडतील हा निजध्यास लागला आहे. सत्वर श्री सेवकाचे मनोरथ पूर्ण करील. श्रीमंत राजश्री भाऊसाहेबांकडील प्रस्तुत नूतन तहकीक वर्तमान काय आले आहे ते स्वहस्ते ल्याहावे. सेवेसी श्रुत होय. दरबारचेहि वर्तमान पुढील बंदोबस्त कोणाचे माथां हे साद्यंत ल्याहावे. सलगीने लिहिले आहे. कृपा करावी हे विनंती.
सेवेसी दामोदर रघुनाथ सा नमस्कार विज्ञापना. स्वामीच्या दर्शनास यावे हा फार मानस आहे. श्रीकृष्ण लवकरिच दर्शनास येऊ. आल्यावर सविस्तर निवेदन होईल. पूर्ववत प्रा कृपा करीत असावे. पदरीचे स्थापित आहो हे विज्ञापना.
[१ लेखक दादो हरि हा कोण ?]