Selections from the Peshwa Daftar 2.15: [8-12-1749] Civil war in Jodhpur between Ramsing and Bakhtsingh. Details are reported to the Peshwa by his agent.
Selections from the Peshwa Daftar 2.15
- Language
- Marathi
2.15
श्री.
पुर्वणी श्रीमंत राजश्री......पंत प्रधान स्वामीचे सेवेसी.
विनंति. राजश्री सवाइजीचे हरकाऱ्यांची जुबानी अर्ज जाहली कीं, मार्गश्वर श्रुध दशमीचे दिवशीं राजा रामसिंग व बखतसिंग या उभयेतांसी मेरत्याचे समीप युधप्रसंग जाहला. दीड दोन हजार माणूस कामा आलें. शेरसिंग मेरत्या व अणखी येक दोनी उमदे मारिले, पडले; व बखतसिंगाकडील यांत बिकानेर वाला मोठा सरदार व पांच साहा सरदार, जेरामसिंगजीकडून निमकहरामी करून गेले होते तेही मारिले, पडले; व खुद बखतसिंगासी बर्छी व गोळीचा घाव लागून दोनी कोस हटला. शिकस्त जाहली. रामसिंगजीची फत्ते जाहली. त्यासी पाहावें, मागती तहकीक कलमी काये वर्तमान येतें, त्या प्रमाणें सेवेसी विनंती केली जाईल. वजिराचीहि तयारी निघायाची लागून राहिली आहे. राजश्री मल्हारराऊ होळकर यांचा मार्ग लक्षितात. हेहि बुंदीचे जिल्यांत येऊन पावले आहेत. तिकडीलहि जाबसाल व राजारामसिंगजीकडील व बखतसिंगजीकडील अत्रे चौकडील लागिलें आहे. पाहावें कोणे रीतीने कोणता रोख करितात. हाल तर राजश्री सवाईजी * * मुबलग बाकी व रामसिंगजी बाबत हवा (ला आ-) ...... टपला. याजकरितां दबाव दिधला; व ताकीदपत्रेंहि लिहिलीं आहेत. येथून सदाशिव दिक्षित व बकशीराम व जे-गोपाळ मुनसी व गणेश यादव व यादो शिवदेव हे सकलहि त्यांजकडे घोडीं वस्त्रें व कांहीं निशापातीसहित बिदा केले आहेत. मजहि यां सर्वांसमागमें दिधलें आहे. पाहावें तेथें पावलियावर काये योजून येतें. वजीरजी तर पठाणावर जायास्तव बहुत बजीदी बादशाहजिसि करितात. बादशहजी उतावली न करणें म्हणून खातरदारी रक्षून पठाण व दुरानी यांजकडे अंतस्ती डौल देतात. चित्तश्रुधता पुर्ती दिसत नाहीं. जाट वजीरजीचे बोलावण्यानरूप दिलीसमीप गेला. वजीरजीचें भले माणूस सामोर आलें. किशनदासजीचे तळ्यापावेतों खुद येऊन जाटासी भेटून संभाषण शपथपूर्वक करून बिदा केलें. व खुद फिरून हवेली दाखल जाहले. अंतस्ती बादशहजींनींहि जाटासी आपले मायेंत घेतलें आहे. पठाणानें कूल वजिराचे जिल्यांत दरोबस्त अमल दाखल केला व करित जातो. ऐसें वर्तमान आहे. इतकीयावर पहावें काये घडोेन येतें. कोटेवाल्याची मामिलत पाचा लक्षावर चुकली म्हणून वदंता आहे. राणाजीकडील व माधोसिंग व उमेदसिंग याजकडीलहि मातबर बोलीचाली निमित्य येऊन पावले आहेत. माधोसिंगजीहि नेणव्याचे मुकामी येऊन शामील होणार. नेणवे या ठिकाणीं ठाणें बसऊन कबजेंत आणावें; किमर्थ कीं, करारा माफिक न उतरला. किशनसिंगानें लबाडीवर चित्त दिल्हलें, याजकरितां हें करणें त्यासीं जरूर जाहलें. त्यासी जें कांहीं घडोेन येईल तें मागून विनंती करीन. राजश्री सवाईजीकडे तर निघतात मुबलरावयानीं (?) शाकाये लवण्याये प्रारंभ केला आहे. तेथें पावल्या नंतर पाहावे परिणाम कसा घडतो. पुरातन जे कोणी मुतसदी आहेत, त्यांस मोठा हृद्रोग लागला आहे. त्यासी येक केशोदासजी त्याची तर ते गती जाहली. राहिला हरि गोविंद व विद्याधर. हे असले नसले बराबर. व तोफखानियाचा दरोगा कदीम शिवनाथ भया म्हणून होता त्यासीहि सांप्रत कालीं जनबाच्यासुधां कैद केलें. व केशोदासजीचे स्त्रीवर सिपायांचा दंगा बहुत जाहला. सरकारांतून ढीलढाल अथवा दिवसगतीचा प्रसंग आडळला. याजकरितां वस्त्रपात्र देऊन सिपाईची तलब चुकाविली जाते. व तमाम जिला उद्धस होत चालिला असे. विदित होये. मागून जें कांहीं नवलविशेष होईल ते सेवेसी विनंती केली जाईल. हे विज्ञप्ति.
[१ सूत्र, अनुसंधान.]
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English