Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.16: [1749] Report sent to the Peshwa of the Rajput war between Sawaiji and Ramsing of Jaipur with Bakhtsingh of Marwar.

Selections from the Peshwa Daftar 2.16

Language
Marathi

2.16

श्री.

पुरवणी श्रीमंत राजश्री......पंतप्रधान स्वामीचे सेवेसी.

विनंती. राजश्री राव केशवदासजीस राजश्री सवाईजिनी *आपल्याकडील फौजेस विलंब लागला व मीरबकशीजीसी जुंज ठहरलें, याजकरितां फौजेसहित सोपुराहून फिरून बोलाविले हा तो विस्तार पूर्वी मुजरत कासिदा समागमे सेवेसी लेखन करून पाठविलें असे, त्याजवरून श्रुत जाहलें असेल. हलीं राजश्री रामसिंगजी व सवाईजी या उभयेतानी येकत्र मसलहत करून युध्यच मिरबक्षिजीसी व बखतसिंगजीसी घ्यावें. जयेदाता भगवान म्हणून राजश्री रावकेशवदासनी हरावल मुकरर करून दिवाण हरि गोविंद व सेखावत व नरुके वगैरे तोफखान्यासहित मुन्हेस ठहराऊन, चंडावल व दस्तरास व दस्तचाप सरदार व फौज नेमून, सर्वांमागें आपण उभयेतां फौजेनसी बहिरबुनगा देस पाठीमागें घेऊन, छ ८ माहे मजकुरी अर्णुदयीं स्वार जाहाले; तों आदले दिवशीं मीरबक्षिसहवर्तमान बखतसिंगजीहि मेर्त्याहून कूच करून दोन्ही अडिच कोसाचे अंतराये रियां होऊन म्हणजे सवाईजीचे उजवेकडे पाऊन मुकाम केला कीं, समीपच पडून दबाव दिल्ह्यानें मामिलत चुकेल किंवा युध्य होईल. समीप मुकाम जाहालिया रामसिंगजी कडील रजपूत फोडिले जातील, म्हणुन भरभरून मीरबकशीस चढून आणिले. त्यासी हे ईकडून स्वार करून नीट चालिले. येतातसें जाणून त्यांनीहि तयारी करविली. बहिर व बुनगाहे पुढें घालून, तोंडेसी उभे होऊन हदबदल दूर कांहीं बखतसिंगजीसी टाकिली, कीं रांगडे सर्व येक, नकले कोणे समईं काय करतिल, यास्तव आतां बखतसिंगजीस आपले समीप हातीवर बसून घ्यावें. त्याजवरून बखतसिंगजीचे लोकांनीं चित्त चोरिलें कीं तुम्हीं कैद जाहाल्याने आमच्याने किमपी होणें नाहीं. याप्रकारें ते दिवशीं तर ती गोष्ट न बनली; व हे इकडून नीट चालून आलेच. फौजेचा तरतूद करितांच देहभान न राहिला, व न कोणी सरदार रामसिंगजीचे फुटले व न मामिलतदार पेश जाहाली व पाणीही लस्करांत नुन्य जाहालें. शिरावर माध्यान्य येऊन पावला. लोक पाण्यानच गारत होऊं लागले. तेव्हां सवाईजिस मीरबक्षीजीहि दस्खत खास रुका लिहून पाठविला, कीं मीहून कांहीं लडाई इच्छित नाहीं. येक बखतसिंगजीचा मामिला व रामसिंगजीकडील दुमदमा तो तुम्ही मध्यस्त होऊन चुकवालच. प्रस्तुत तर तुम्हांस हल्हेचा सलाह कीं हरावलासी पुढें वाढूं न द्यावें. आम्हीहि डेरा करितों. तुम्हीहि डेरा करा. सारांश या उभयेतांजवळ तीस पस्तीस हजार फौज व तोफखाना मातबर; या उभयतांसी येका बखतसिंगामुळे वैरत्व साधून नफा काये म्हणू? सौरस्वभावेकडून थोरपण भोगून, सन्मुखेहून उजवीकडे कातरतेंसे घेऊन, दोन्ही कोसाचे अंतराये जाऊन डेरा केला. यांनीहि पाहिलें कीं राजारामसिंगजीची येसमईं साह्यता करून फौजखर्च वरचेवरी मिळविला; व उभयतांवरी गॉलबता संपादिली; हेंच मुन्हे प्रथमता साधून महद्येशाचें कारण जाहालें. अतां खामखा हटनग्रहे धरून जुंझ घ्यावें तर बादशहर्जीसी कमरबंदी होऊन राठोडांतहि विरुध वाढतो.

[* Sawaiji is the title of Ishwarsing : he styled himself Sawai Ishwarsing.]

[१ आघाडी.]

[२ मुन्हा = सामना.]

[३ रियां नांवाचें गांव.]

[४ वरचढपणा.]

दुसरें रामसिंगजीकडील उमदे रजपूत त्यांचे आचरणामुळे दुंदिले होऊन आपलेले ठिकाणीं निराळे होऊन बसले. याजकरितां त्याजकडील तर बाजी हलकी, केवळ आपल्याच अंगावर बिघाड, अंगेंजून बेतलिया परिणाम बरा नाहीं, याजकरितां इतकाच उपर जाणून, मिरबकशींचेंच म्हटलें ऐकिलेसें करून, त्यांसच थोरपण येऊन, मौजे रीयाचें गीर्दपेशां दहा कोसांत पाणी नव्हतें म्हणून रियाचे डावीकडे कोसा दीडा दोच्या तफावतनें मीरबक्षीचे सामोरें मुकाम केला. आजि दोन्ही दिवस जाहले, कीं उभयपक्षीं रदबदल लागून राहिली व त्यांजकडील पाणी सरलें. पुढें त्यानी कूच करावें तर पाणी याजखाले, हे आडवे येतात, यास्तव मिरबकशीजीहि जेथील तेथेंच मुकाम करून बख्तसिंगासी बहुत लाजविलें कीं तुजमुळे खिपंत खाल्ली. तुजकडून किमपि न जाहलें म्हणून तोपखाना कुल आपले डेऱ्या भवताले रचून, कोणीक मातबर माणूस मधें पडोन, फैसल करून स्वरूप रक्षी म्हणून मार्गप्रतिक्षा करितात. त्यासी कालीं छ १० रोजीं त्रिकानेरचा राजा दोन्ही हजार फौजेनसी त्या समीप येऊन पावला. त्यानें त्यासी धीर देऊन इकडेहि सांगून पाठविलें कीं, आपण थोर आहांत ; बुर्ददारीच करणें आपणासी योग्य. मीहि सेवेसी येऊन पावतौं. तोंवर उतावळी न करावी. त्याजवरून यानीहि मुकाम केला. यांची वासना हेच कीं जे कांहीं दिधलें तें दिधलें ; बाकीची निशा लिहून दिधली. ते पर्टून पायमलींत घ्यावी व मामिलतेंत तखफीक घेऊन नारनोर व आगरे याचा इजारा करून घ्यावा व रामसिंगजीचीहि मामिलत करून देऊन बख्तसिंगजीसहि येहसान मंद करावें. दोघांसहि हातांत घ्यावें. त्यासी पहावें काये घडोनि येतें, त्याप्रमाणें विनंती सेवेसी केली जाईल हे विज्ञाप्ति. * * * * * *