Selections from the Peshwa Daftar 2.17: [1749] Complications in Marwar reported to the Peshwa by his agent. The date of the paper deserves to be determined.
Selections from the Peshwa Daftar 2.17
- Language
- Marathi
2.17
श्री.
पुर्वणी श्रीमंत राजश्री...........पंतप्रधान
स्वामीचे सेवेसी
विनंती. राठोडाकडील वर्तमान तर राजा रामसिंगजी तर हा कालवर मेरत्यांत आहेत. व पेशखाना नागोरच्या रुखें बाहेर उभा केला आहे; याजवरून बख्तसिंगजीनींहि पेशखाना बाहेर उभा केला. जे कांहीं रजपूत फुटोन बखतसिंगजीकडे गेले होते, ते तों त्यांजवळच आहेत. व राजश्री सवाइजीकडीलहि पांच सातशें स्वारानिशी ज्यादोदास नामे वाणी महत तरिकें त्यांसमीप आहे. हा कालवर कांहीं त्यां रजपुताचे जिल्ह्यांत रामसिंगजींहिं अमल दखल केला नाहीं. जगंनाथ पुरोहित पुष्करीं मुकामात करून फौजबंदी करितो, व अजमेरच्या किल्यासीहि मोरचे लाविले; परंतु अमरसिंग गौड त्यांत मजबूत आहे. त्यासी बखतसिंगाकडील सूत्र लागलें आहे. या दिवसांत वर्तमान कीं बखतसिंगजी सात हजार फौजेनिशी डेरे दाखल जाहले. मेरत्याकडे जाणार. येवंच तीकडेहि मागती कलहाग्नी प्रदीप्त जाहलासा आहे. जें कांहीं घडोन येईल तें सेवेसी विनंती करणेंत येईल. बाहादुरसिंग रूपनगरकराचा कनिष्ठ बंधू रूपनगरांत मजबूत आहे. सावंतसिंगजी राजश्री सवाइजी समागमें येथें येऊन फौज व तोपखाना पाठवायानिमित्य वजीद जाहले; परंतु फौजखर्च त्यांजकडून नगद् कांहीं न होऊं सकले; याजकरितां दोनी चारीशें स्वारांनिशीं येक वाणी किरपाराम नामें त्या समागमें करून दिधला आहे. त्यासी रूपनगरचे गिर्दपेशांत तर कुली अमल दखल सावंतसिंगाचा आहे. किल्ला मात्र त्यानें हस्तगत करून मजबुती केली आहे. त्यासी साह्यता बखतसिंगजीकडील विशेष त्याचा वचक सर्वांशीं आहे. पाहावें काय घडोन येतें. हें विज्ञाप्ति
[१ दोहींकडे चित्त. २ सभावार. ३ फजीती.]
[४ ......... ५ उपकारबद्ध. ६ तंबू वगैरे सामान.]