Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.18.9

Selections from the Peshwa Daftar 2.18.9

Language
Marathi

2.18.9

जर विजयेदशमी करून राजश्री सुभेदार इंदुराहून या प्रांते येतात किंवा परभारे देशास जातील. जर देशास जातील तर आम्ही लाचार आहो. माधोसिंगाचेच मरजीनुरुप एकास दाहा पंधरासे रावतानिशीं भले मनुष्य शामील फौज माधोसिंगाचे करून देऊन मग ते जे कर्तव्य करो. खासा जावे हे तर विदीत नाहीं. याप्रकारे महारावजीस बोध करून लाऊन घेतले. सुभेदाराची मार्गप्रतिक्षा केली. त्यास श्रीसुभेदारजी तर उतावलीनेच येतो परंतु गौतुमाबाईचा प्रकार वीस दिवस अवरोधाचा जाहला. तथापि दसरियाचे महुर्ते कूच केला. ते वीस हजार व मातबर तोफखान्यासहित येऊन मकुंददन्यांतून पाचा कोसावर येऊन पावले; व नेणवेकरास खातरजमाची पत्रे पाठविली जे आलो, जागा सांभाळून राहणे. दुसरे कोटेकरास लिहिले जे जर लवकर येऊन आपले सरहदेवर भेटताच कराराप्रमाणे ऐवज पावतां तर तुमचे मुलकांत उजाड न होऊन देता. तिसरे मुक्कामाने चंबलपार होऊन जाऊ. नाहीं तर मुलुक उजाडला म्हणून नालीस न करणे. या प्रकारे साफ पत्रे पावली. तत्क्षणीच महारावजीनी राजश्री आखेराम दिवाण यासमागमे हजार राऊत देऊन राजश्री सुभेदाराकडे छ १७ मजकुरी भेटीस पाठविले. दिवाण मजकूर थोडे बहुत साजसरंजाम फारफरमSubject: Re: Transcribe this page