Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.19: [26-9-1750] Malharrao Holkar, who is sent by the Peshwa to settle the disputes of the Rajputs, writes to the Peshwa from Khandesh asking him to send Jayappa Sinde at once and not detain him for fear of Yamaji Shivdeo in the South. The foresight of Holkar and a real grasp of the situation are evident in this let

Selections from the Peshwa Daftar 2.19

Language
Marathi

2.19

श्री.

पो २० जिल्काद

राजश्री......पंतप्रधान साहेबाचे सेवेसी

श्रीमंत सकल गुणालंकर्ण अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य...स्नो मलारजी होलकर कृतानेक दंडवत विज्ञापना. येथील कुशल आस्वीन शुध सप्तमी मुकाम नजिक बेटावद पावेतों साहेबाच्या प्रतापें करून यथास्थित असे विशेष. कृपा करून पत्र पाठविलें तें छ ३ सवालीं पावोत बहुत संतोश जाहला. मालवे प्रांतीं जाऊन जमीदार गिरासे यांजला नतिजा पाऊन तो पावेतों राजश्री जयाजी सिंदे याची रवानगी करितों. हेही येतील. आवघ्या फौजा येके जागां होऊन पुढें रजपूत राजे वजिराकडील व गुजरात प्रांतीं जावयाचे येसीं राजकारणें उपयोगी पाहून करावी. येसे कितेक प्रकारें पत्रीं आज्ञा केली. त्यास आम्हीं वाफगांवींहून निघालियासी दोन मास होत आले. राजश्री जयाजी शिंदे यांचीं पथकें रवाना करणार. त्याची मार्गप्रतीक्षा केली. हिंदुस्थानचा कारभार भारी. तो भारीपणेंच करावा. अवघे येके जागां असावें. त्यास राजश्री येमाजीपंताच्या कार्याकरितां राजश्री जयाजी सिंदे यास तिकडे जावयाची आज्ञा केली. त्याचें पारपत्ये करणें कांहीं साहेबास विशेष नाहीं. येक्या पथकास आज्ञा केली तर जाऊन त्याचे पारपत्ये स्वामीच्या प्रतापेंकरून करिल. येक्या कामाकरितां कित्येक कामें तटवावीं यसें नाहीं. राजश्री भाऊसाहेब प्रस्तुत तिकडे गेले तेव्हां तेथें कोन्हीं धम धरून डोई काढू शकतो यसें नाहीं. साहेबाच्या प्रतापें करून सर्व मनसबे कामें नीट होतात. तेथें येमाजीपंताचा लेखा काय आहे? तथापि उपेक्षा कार्याची नाहीं. चाळणा करितच असावी. परंतु येकाच कार्यावर द्रिष्टी द्यावीसें नाहीं. हिंदुस्थानचा कारभार भारी याचाही विचार केला पाहिजे. येक वरीस फौजा त्या प्रांतीं न गेल्या. त्यामुळें कित्येक रजपूत राजे मोगल व जमिदार फडी धरितांत. त्यांजला नीट करून नक्ष राखून लाभालाभहि विचारला पाहिजे. विजयादशमीहि होत आली. याउपरी येखादीकडे जाऊन कामकाज जाले पाहिजे. राजे ईश्वरसिंग व रामसिंग उभयेतांनीं कापट्यभाव चित्तांत आणून केशोरायासि मारिलें. त्याचें पारपत्ये करणें जरूर. दिल्लीकडील वजिराचें राजकारण, तसेंच गुजराथचा बंदोबस्त करणें येविषयीं पत्रीं आज्ञा केली. त्यास साहेबाच्या प्रतापेंकरून जे जे उपयोगी राजकारणें ते विचारें करून करावयाची ते होतील. दसरा जाला. याउपरी फौज जमा होऊन कार्यभाग जाला पाहिजे. राजश्री जयाजी सिंदे याची मार्गप्रतीक्षा आजी पावेतों केली. प्रस्तुत साहेबीं आज्ञा केली कीं, त्यांजला दसरीयासी खाना करितों. सत्वर आलिया उत्तम आहे. त्याचा गुता न होतां निरोप देऊन व आणखी पथकें पाठवावयाची जैसी रवानगी सत्वर केली पाहिजे. *स्वामींनें पत्रीं मनसबियाचा विचार सविस्तर लिहिला, त्यास तो येथार्थच आहे. किरकोळ कामें तों स्वामीच्या पुण्यें करून सहजांतच आहेत. परंतु मातबर हा मनसबा आपल्यास उपयोगी भारीपणेंच केला पाहिजे. त्यास फौजा दोन्ही वगैरे पथकें आवघीं येके जागां होऊन, युक्त उपयुक्त सारासार विचार करून, कार्यभाग केला पाहिजे, येविषयीं आपण सर्वज्ञ आहेत. जो जो विचार मनसबा योजेळ तो शेवेसीं लिहित जाऊन. साहेबीं वरचेवरि आज्ञापत्रीं बुध्दीवाद लिहित असिलें पाहिजे. शेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. @S मोर्तब सुद.

[१ एकटा.]