Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.20: [September 1750] Malharrao Holkar on his way to Delhi communicates to the Peshwa from Khandesh the news he had received of the defeat of the Vazier by the Rohillas and urges him to send Jayapa with reinforcements with all possible haste. The Peshwa in concert with Holkar and Scindia undertook this new venture in the

Selections from the Peshwa Daftar 2.20

Language
Marathi

2.20

श्री

पुर्वणी श्रीमंत राजश्री......पंत प्रधान

स्वामीचे सेवेसी

विनंती. दिलीकडील वर्तमान तर वजिरुलमुमालक यानी अंतरवेदींत जाऊन पठाणासी झुंज टाकिले. जाट वगैरे सर्व जमिदार हरावलीस पाठविले; व आपण मागून तयारींत राहिले. जाटावरी म्हणजे हरावली फौजेवर जवं जव गाठ पडत गेली तशी तशी वरचेवर यानी हरयेक सरदारासी त्यांचे कुमकेनिमित्य बिदा करीत गेले. येथवर कीं, कुल सरदार व फौजेनिशी पुढे दोन्ही कोसांचे तफावतीनें पावले. खुद पाच हजार स्वार टोपीपोश व इसहाकखान व वजीरजीचा पुत्र वगैरे खांसे खांसे डेऱ्यात राहिलें. जमिदार दगा करितील, पळ काहाडितील म्हणून यानी सर्वांसी पुढें दिधले; व आपण पुँस्तगर्मीस राहिले. त्यासी त्यानी प्रथम मुन्हेमात्र कांहींसी घेतली. जमीनदार सर्व एकमत होतेच. तन न दिधले. बनगडवाला रोहिलाहि ऐन समयात येऊन पावला. याजमुळे हरावळी फौजेवर येक मु॥ पठाणाही नमुदैकरून तमाम फौजेनिशी वजीरजी स * दा जाणून अरडून पडले. तोपखानियाकडील पिऊन हातघाई बरीशीच संभाळली. येथवर कीं, नवाब वजीरजीचा भाचा मिर्जा नसिरुदी महंमद व नवाब इसहाकखान च्याहरुजा बकशी हे उभयेता मारिले, पडले. व नवाब वजीरजीचा माहावत ठार जाहला. सेवटीं वजीरजीहि स्वथा हाथीहुला (?) वजीरजीस गोळी व तिराची जखम लागली. हाथी अवरेनासा जाहला. वजीरजीस मुर्छा आली. तेव्हा वरकड सरदारांच्याने तग न धरवता चाल निघाली. तमाम फौज लुटीस पडली. हरोली फौजेस कळलें कीं, पठाणाही पिछाडीवर जाऊन वजीरजीस मारून घेतलें. या रितीनें हंगामा होऊन तमाम फौजे गारत जाहली. खजाना व तोपखाना कूल विल्हे लागून चुकला. तेव्हा समागमचे मातबर होते त्याहीं पाहिलें कीं, वजीरजी तर मृत्यूप्राये जाहले. अतां पठाण गालिब. मुडदाहि जाऊं देणार नाहीत. हर प्रकारे मुडद्यास तरी सलामत घेऊन निघावें, म्हणून कोलजलेसरचा किला समीप होता. तेथवर येऊन पावले. येक रात्री त्या ठिकाणीं कर्मिलीं. तों प्रातःकाळी वजीरजी शुधीवर आले. बहुत काही प्राणत्यागीं हट धरिला. परंतु समागमच्यानी सावधता करून रक्षुन जे कोणी फुटकर येत गेले, त्या सर्वास येकवट केलें. हजार पांच सहा फौजेनसी तेथून वजीरजीस मेघांडबरांत घालून नीट दिल्लीस घेऊन आले. मग कललें कीं वजीरपुत्र समागमे होते. यानी दगा करून लढाई बिघाडिली. सारांश, भवितव्यानरूप होऊन पठाणाची बाजी सरसी राहिली. तलावर तल येऊन केला. यांजकडील तमाम सरदार व फौज पळाली. पठाणाकडील सरदार बहुत मारिले पडले. येथाकिंचित दिल्लीस येऊन पावले. जखम अद्यापि बरी जाहली नाहीं. हवेली दाखल बादशहाजीनी बजितींने करविले. जखम बरी जाहल्यानंतर बादशहाजी येऊन घेऊन जाणार. अथवा हेच खुद मुलाजमती निमित्य जाणार. येवंच वजीरजीस तर हाच हट कीं मागती पठाणावर कमरबंदी करावी. याजकरितां खुद बादशहाजीसहि बाजीद आहेत. बादशहाजीही अंतस्ती अश्वासन दिधलें, व बाहियार्थी तुरानी यांचेहि मानस रक्षायास चुकत नाहींत. तुरानी तर परम प्रफुलित जाहले आहेत. परंतु वजीरसाहेब खजाना आहे. अद्यापिहि जाट वगैरे जे कोणी समागमचे शिकस्त खाऊन फिरून येऊन पावतात, त्यासी खर्चास देऊन दिलासा दिलबारी करून नित्यानी फौजबंदी करितात; व स्थलोस्थली ताकीदपत्रेंहि पाठवितात; व बादशहाजीही फर्मान बोलावयाचे नवाब नासरजंग व मीर मनू लाहोरचा सुभेदार वगैरे या सर्वांसी पाठविले आहेत; व अंतस्ती पठाणाकडील अर्जदास्त तकसीर माफीचा येऊन पावला. त्याचीहि खातरजमा करितात. मिरबकशीजी इकडून जाऊन पावले. मुलाजमत जाहली. हाथी, घोडे व मोत्याची माल वगैरे भूषण वस्त्रे जे इनायेत करायाची ते करून बहुत कृपासी जाणविली. यानीहि हलकाई पाहून तुरानीयांकडेच डौल दिधला आहे. तरी वजिराची इतकी बाजी खचली असतांन्हि सर्वांस वचक आहे. पेशँखाना तर बारापुल्यावर उभा राहिला असे. खजानियाची ममता न करावी म्हणून वरचेवर बादशहाजीस पूट देतात. पहावें इतकियावर काये घडोनि येते. जाटहि हजूर जाणार आहे व पठाणाहि तर कूल अंतरवेदींत काये (ल ?) इटावा वगैरे खालसा माहाल बादशाही या जिल्ह्यांत अमल दखल केला, व करितात; व जमिदाराही काबू जाणून सर्वठाई दस्तदँराजी मांडली आहे. समये हंगामचा त्रथा किमर्थ जाऊं द्यावा, म्हणून हर येकाही यथाशक्त प्रयेत्न मांडिला आहे. वजीरजी अपल्याकडील फौजेची व सरदारांची परम प्रतिक्षा अहिनिंश करितात. याचा विस्तार तर राजश्री बापूजी महादेव यांचे विनंती पत्रावरून सर्व सो श्रुत जाहलें असेल. येथेंहि जे कांहीं ऐकणेंत आले ते सो श्रुत व्हाया निमित्य विनंती केली असे. मागती जे कांही घडोन् येईल तेहि विनंती करणेंत येईल. बहुत काये लिहिणे हे *विज्ञती.

[१ मदत, राखीव फौज.]

[२ सामना.]

[३ भारी.]

[१ कमरद्दीन खानाचा मुलगा, इंतिजामुद्दौला (?) पहा म. वि. २ पृ. ३२८.]

[२ आग्रहानें. ३ युद्धोपयोगी डेरे वगैरे सामान. ४ जुलूम.]