Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.2: [पौ. 5-4-1747] Letter of Peshwa’s agent at the Emperor’s Court communicating to him the favourable impression the Emperor had obtained of the Peshwa’s doings. His mother Kashibai's pilgrimage gave some offence to Safdarjang.

Selections from the Peshwa Daftar 2.2

Language
Marathi

2.2

No. 2]

पो छ ५ रबिलाखर

पुरवणी श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे शेवेसी.

विनंती उपरि उमदतुंनमुलुक शांत जालियावर नवाब सफदरजंग याची मुसोहेबत बहुत जाली. त्यास बेनुखालीफ यासी जोड केल्याखेरीज बंगालीयाचें काम कोणेप्रकारे होते ? याकरितां पातशहास अर्ज केला कीं, नवाब सफदरजंग आम्हांसीं येकसुं असल switch यानें हजरतची उत्तमप्रकारें कामे होतील. नाहींतर आहे आणिनी येथें एक गोष्ट सांगितली. न कळे, हजरतच्या ध्यानांत काय येईल ? म्हणू|पा(तशा) पातशाही कामाचा उव्हेला होईल. त्यावरून पातशहा बोलले कीं, सफदरजंगाच्या व बाळाजीरायाच्या दरम्यान मी आहे. याप्रमाणें बोलून सफदरजंगास पाईं देव्हडीजवळ येकांतीं घेऊन सांगितले कीं, बाळाजीरायापासून मजला फारशी उमेद आहे. आणि ते सत्यवादी आहेत. याकरितां त्यासी तुम्हीं साफ राहून पातशाही काम करणें. सफदरजंगानी विनंती केली कीं, 'पहिल्यापासून माझी त्यांशी दुश्मनी होती. हजूर आल्यावर राव महादेव यांनीं बाळाजीरायाच्या माझ्या दरम्यान ईश्वर दिल्हा; त्याप्रमाणें म्याही दिल्हा. कधींही कोणास शपथ दिल्ही नव्हती, ते त्यांस दिल्ही. खज्याना लुटून आणिला होता, तों राव महादेव यांच्या पुत्राजवळ दिल्हा. वकील सरदारांजवळ पाठविला. त्यासी वाराणशीची गोष्ट सांगितली. त्याजवरून मजला विश्राम वाटलें. अतःपर जे हजरतची मर्जी तेच मजला करणें.' या प्रमाणें बोलणे जालियावर दुसरे दिवशीं पातशहानीं खालशाचे दिवाण नवाब यह्याखां यांसी सफदरजंगाकडे पाठविले. आणि आम्हासही आज्ञा केली. त्यावरून सफदरजंगाचे घरीं आम्ही गेलो. बहुतसें शिष्टाचारें बोलून सारांश हाच कीं ज्याप्रमाणें तुम्ही मसीं वर्ताल त्याप्रमाणें मी तुम्हासी वर्तेन आणि तामकेदूर तुमचे कार्यास अंतर करणार नाहीं. याप्रमाणें जालियावर तनखा वगैरे ठरली. इतकियांत वाराणशीचे लिहीलें बलवंतसिंगाचे आलें कीं मातुश्रीनी दसाराम जमीदार यासी कविल्यासह्या घेऊन चालली; आणि आम्हास सांगुन पाठविले कीं, यासीं अर्धे राज्य देणें, नाहींतर फौज उतरेल. यासीं आम्ही दसाराम़ास आणून यासी शिक्षा द्यावी तर हजरत वारंवार लिहीतात कीं, ते माझीच मातुश्री जाणून त्यांचें साहित्य करणें. तुमची चार माणसे मारली तन्ही त्यास हर्रगीज न बोलणें. कां कीं, माझ्या म्हटलियावर माझे घरांत आली. त्यासी कव्हावत जालिया आम्हास शब्द लागेल यैसी हजरतची ताकीद, आणि हे लोक ऐसी करितात कीं, हलक्याहून हलका असेल तेही ऐसे कर्म न करी. या प्रमाणे अर्जी बलवंडसिंगाची आली. ते बजिनैस आम्हास दाखविली. आणि हसून बोलिले की, हे तुमची सत्यवादी भलेपण. तेव्हा आम्हीं विनंति केली कीं, मातुश्री या प्रमाणे करितील ऐसे नाहीं. बराबरचे लोकानी कर्म करून नाव याचे बदनाम केले. तरी नवाबानी बहुतच थोरपण केले. जमीदार आम्ही आणून देतो; परंतु गोष्टीवर नवावाची शुक्रगुजारीच श्रीमंत करतील. याप्रमाणे जाले वर्तमान सेवे CC-0. Agamnigam Digital Presevation Foundation, Chandigarh

[१ अमीरंखान २५-१२-१७४६ ला खून जाहला. २ स्नेह.]

[१ बिघाड.]

[२ शक्ति आहे तों.]

[३ पेशव्याची आई काशीबाई.]

[४ बिलकुल.]

[५ खुद, हुबेहुब.]

[६ तारीफ.]

लिहिलें असें. मातृश्रीस जमीदाराचा मजकुर लिहिला. त्याचे वर्तमान नवाब सफदरजंगास आले कीं, रा। कृष्णराऊ याणी कागद गंगाप्रवाह केले; आणि मन मानेसे बोलले. आम्ही तो मातृश्रीच्या तर्फेनें सांगितलें कीं, दसाराम पटणेकराच्या कैदेत होता. त्यानी बहुत मीनत केली. याकरितां आम्ही सोडविला. अतःपर आम्हासी त्यासी गरज नाहीं. नबाबांनीं आमचा बहुत अहंल सोसून यात्रा उत्तम प्रकारें आमची केली. या गोष्टीची कोठपर्यंत शुक्रगुजारी करावी. याप्रमाणे जालें वर्तमान सेवेसी लिहिलें असें. बहुत काय लिहिणें. कृपा केली पाहिजे, हे विनंती.