Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.3: [8-3-1747] This fragmentary letter of Hingne to the Peshwa from the Court of Delhi, gives news of the movements of Ishwarsingh, King of Jaipur, and the Marathas.

Selections from the Peshwa Daftar 2.3

Language
Marathi

2.3

श्री

पौ छ ६ रबिलाखर

श्रीमंत राजश्रीपंतप्रधान स्वामीचे शेवेसी

विनंती सेवक बापुजी महादेव व दामोदर महादेव कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती. येथील कुशल ता। छ ७ माहे रबिलावल मु॥ इंद्रप्रस्थ स्वामीच्या कृपावलोकने यथास्थित असे विशेष. पुर्वी सरकारच्या जोडी बरोबर सविस्तर वर्तमान लिहून पाठविले आहे. पाऊन श्रुत होईल. सांप्रत सरदारांनीं स्वामीच्या आज्ञेप्रमाणे माधोसिंगास टोंक, तोडा, मालपुरा व नेवाई, हे चारी परगणे नेमून बुंदी हाड्यास द्यावी व हाड्यानीं ईश्वरसिंगाची रफाकत करावी; व सरकारचे पैसे द्यावे; व नेणवे, व समिधी, व करवार हे तिन्ही परगणे रावराजा व प्रतापसिंग यानी खावे. ऐसा तह करून राजश्री खंडेराव होळकर यांस हजारा स्वारानसी राणाजीकडे पाठविलें कीं; राणाजीची फौज सरदेवर आली आहे. ईश्वरसिंगानीहि आपली फौज त्याच्या मुकाबल्यावर पाठविली आहे. या दोही फौजेचे झुंज होऊन, वि. ज्याप्रमाणें नेमणुक केली आहे त्याप्रमाणें वर्तवणें; व इकडे राजश्री रामराव मुनसी व निवाजी खाटके, बक्षिराम ऐसे त्रिवर्ग महाराजा ईश्वरसिंगापासी पाठविले कीं, यास समजाऊन चार गोष्टी उत्तमप्रकारें सांगून तहाप्रमाणें फैसल करून अरस्परे सौरस्य करून देणे. त्यास रामराव वगैरे जयनगरास आले; व खंडेराव जाऊन राणाजीचे फौजेत शामील जाले. राणाजीची फौज सरदेवर आली. इकडून राये नारायेणदासजीहि भारी फौजे सुधां जाऊन पावले. परस्परें कोसा कोसाचे अंतर राहिलें. राणाजीचे कारभारी यांनीं आपल्याआपल्यांत स्नेहाचा ठैराव करून नारायणदास सडेच फौजेतून जयपुरास आले; व त्याचे कारभारी त्यांजकडे गेले. नारायणदासाच्या ईश्वरसिंगाच्या मसलती उदंड जाल्या. रायजीनें उदंड समजाऊन सांगितलें कीं, मल्हारबाचा लेक येऊन मधें पडला आहे, झुंज करू नका म्हणतो, व सरदाराची मर्जी खामखां स्नेह करवावयावरच आहे. झुंज केलियानें राणाजीची तो काय कथा परंतु मराठ्यासीं विरुध वाढते. यासी विरुध करणे सलाह नाहीं. याकरितां सांप्रत सलाच करावा. त्याहीवर रजपुत कोण्ही तन देत नाहींत. कोणाच्या भरवसीयावर हा प्रसंग कर्तव्य? ऐसे नानाप्रकारें रायजीनें समजाऊन सांगितलें. ईश्वरसिंग सहसा न मानी. म्हणो लागले कीं, राज्य प्रात्कनी असल्याचें भोगावें. नाहीतर अशानें काय होतें. जे होणार तें हो. येकदां झुंझ तो केले पाहिजे. राजामलजी मेले. विद्याधरजी खाटेवर पडला. रजपूत तन देत नाहीं. तुम्ही सलाच्या गोष्टी सांगतां. तेव्हां राज्याचा भार माझ्या प्राक्तनास आला. अस्तु आतां मीच बाहेर निघतों. जें होणार असेल तें हो. यसें बोलोन डेरे बाहेर केले. राजा बहुत दुराग्रहांत पडला. व कोणेही प्रकारें संधी करीनासा जाणून राइजीनी लाइलाज झुंजतो हेच गोष्ट कबूल केली. तेव्हां राज्यानी रायेजीपासून मुचलका घेतला व सहज रायास लष्करां * * *

[१ चांसकर काशीबाईचा भाऊ.]

[२ आबाळ? त्रास.]

[३ साहाय्य.]

* * * *

Discussed in (1)