Selections from the Peshwa Daftar 2.25: [1750 (?)] Malharrao Holkar writes to Mahadoba Purandare details of his dealings with Madhosingh and other Rajput kings. Gangadharpant is Chandrachud and Ramajipant is the Scindia's Diwan appointed in 1750. The inner intrigues mentioned in the letter deserve to be cleared.
Selections from the Peshwa Daftar 2.25
- Language
- Marathi
2.25
श्री.
राजश्री महादाजीपंत गोंसावी यासी
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य श्रों। मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपरी. येथील कुशल जाणऊन स्वकीये कुशल लिहित असिलें पाहिजे विशेष. राजश्री त्रिंबक विनायेक याजला पूर्वी पत्र लिहिलें होतें. पत्रार्थ आपणापासी त्यानीं निवेदन केलाच असेल. त्याचे प्रतिउत्तर अद्याप येत नाही. राजश्री राणाजीकडून
* * * * * व गोविंद कृष्ण आपलीं पत्रें माधोसिंगाच्या राजकारणाची आणळी, त्यावरून वचन प्रमाण देऊन खामखा कार्ये करोन द्यावे, पैका घ्यावा जैसा निश्चये. त्यांसी राजश्री बावा * *
* * जी पावेतो सोसिलें; परंतु येक खावंदाचे काम बुडवावें आणि आपला लौकिक करून दाखवावा, जैसा अभिमान तेथे येके विचारें होऊन खावंदाचें कार्य कैसे होऊन येईल ? हे काम तो मातबर. येथील प्रसंग या प्रकारचा. जैसे जाणून श्रीमंत स्वामींच्या पत्रीं सविस्तरे लिहिलें आहे ते अक्षरशाह ध्यानास आणून स्वहिताची गोष्ट जाणून खामखा हे राजकारण करून पैका घेणे. जैसे उत्तर आलिया कार्ये करितों. बुधेलखंडचे काम विल्हे लागोन पुढे माधोसिंगाच्याच राजकारणास लागतो. तो पावेतो आपलेहि उतर येईल. खावंदाचे श्वहित जाणूनच हे कार्ये खामखां करणे आहे. केवळ दुराग्रह करून नाश * * जैसे नाही. आपले कार्ये होऊन * * * यस्थास्थित वर्ततील जैसे करितों. आमचेविसी आपल्यापासी दर्शऊन सदरें घातली आहेत कीं उग्याच हाचवांगेपणाच्या गोष्टी, लटकिया, येकहि राजकारण खरें नाहीं जैसे बोलतात. राा बा * * * दुराग्रहपणाची ते कोट * * * धवी. आम्ही राजकारण आणावे ते लटके करून दाखवावे जैसा अभिमान. त्यासी हे राजकारण खरे करून पैका घ्यावा हे सिध आहे. आण प्रचीतीस आणून देतो. केवळ आम्ही श्वहित म्हणून आग्रह करीत नाहीं. खावंदाचें काम श्वहिताचे देखोन करितों. जैसे असतां राा बावाचाच आग्रह सेवटास न्यावा, आण आमचा अपमान करावा जैसे उतमात गोष्टी नाहीं. येक खावदाचे स्वहित जाशुन विस्तारें लिहिलें आहे. यामधें उचित ते करावें. * राजश्री गंगाधरपंत व रामाजीपंत यानी आपणास पत्र लिहिले आहे, त्यावरून सर्व आर्थ ध्यानास आणून उतर पाठविलें पाहिजे. लोभाची वृधी करावी हे विनंति.
[* पत्र मल्हारराव होळकराचें.]