Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.24: [October (?) 1750] Malharrao Holkar writes to the Peshwa to despatch Jayapa Scindia urgently to the North. He was at Sangola with Sadashivrao Bhau.

Selections from the Peshwa Daftar 2.24

Language
Marathi

2.24

श्री.

शेवेसी विज्ञापना. श्रीमंत राजश्री भाऊ सातारियाकडे गेले. तेथील बंदोबस्त कोणे प्रकारे जाला ? करवीरवासी राजश्री याजकडील काये वर्तमान ? राजश्री येमाजीपंत याचा बंदोबस्त कोणे प्रकारे जाला ? ते सविस्तरे आज्ञापत्रीं लिहिले पाहिजे. हिंदुस्थानातहि वखेडा जागा जागा जाला. मनसूरआलीखान कामास आले. याजकरिता प्रस्तुत नवाच कारभार होणार. आपली फौज शहावर पुढें कोणी नाहीं. याजकरिता सारी फौज येके जागा होऊन पुढे जावें. मग जैसा मनसबा पडल, आपला उपयोगी, तो करावा. दसराहि जाला आणि दिपवाली आली. या दिवसात शहावर काहीम राहून जैसा मनसबा योजून येईल, तो विचारे करून करणें, तो करावा. सर्व खावदाचा प्रताप आहे. राजश्री जयापाची रवानगी सत्वर केली पाहिजे. *शेवेसी श्रुत होये हे विज्ञापना.

[seal: मोर्तब सुद.]