Selections from the Peshwa Daftar 2.26.7
Selections from the Peshwa Daftar 2.26.7
- Language
- Marathi
2.26.7
विनंति उदास न कीजे. विनंतिपत्र सविस्तर वांचून आज्ञा केली पाहिजे. सेवकांचें कुरण मौजे भिवरीस आहे, तें सरकारांत घेणार म्हणऊन ऐकिलें. त्याजवरून मागें दोन वेळा विनंति पत्रें सेवेशीं लिहिलीं होतीं. तरी कृपाळु होऊन, सेवकाचें कुरणाची मोकळचिट्ठी देवविली पाहिजे व सालाबाद-प्रमाणें वराता व शेतसनदा आमच्या देविल्या पाहिजेत. व कोठीचें दस्तक व लांकडे आणावयाचें दस्तक देविलें पाहिजे. हरएकविशीं विनंति तीर्थस्वरूप हरीपंत करतील ते उदास न करावी. विठ्ठलपंत कसबा ग्वाल्हेर येथिल फौजदारीचा अम्मल आजी दोन वरशें दरोबस्त खातात. स्वामींनीं ताकीदपत्रें तीन चार दिल्हीं, परंतु न मानलीं. व जमीदारांच्या नांवें ताकीदपत्रें दिल्हीं तें आम्हांपाशीं आहेत. शहर त्यांचें आमचें समाईक, मुकासा निमेनिम असतां फौजदारी त्यांनींच खावी हें उत्तम नाहीं. त्यांची फौज या प्रांतीं होती. आतां आम्हांस अंमल बसावयासी फौजदारीचा शहरांत अगादी काये आहे ? परंतु स्वामींची आज्ञापत्राचीं वाट पाहतों. ऐसा कलह आपल्यांत आपण वाढवावा यसें नाहीं. तेथें विठ्ठलपंत आहेत. स्वामींनीं कृपाळु होऊन त्यांस ताकीद करून त्यांचे मामलेदारांस ताकीद खामखा पाठवावी. जें मागें जालें तें उत्तम जालें. आतां तुम्ही मुकाशाप्रमाणें फौजदारीचा अंमल निमेनीम चालवावा. येविशीं आपण हैगै केली तरी सरकतीचें दुःख एक प्रकारचें आहे. स्वामी मायेबाप आहेत. मायेबापास थोरलहान लेकरें सारखींच असतात. आपणच हैगै केली तरी आम्ही तुडवणीस पडतों. याजकरितां विनंति वारंवार लिहितों. सालगुदस्ता दोन वरसांची छावणी हिंदुस्थानची करून घरास आलों. तसेंच सातारां CC-0. Agamnigam Digital Preservation Foundation, Chandigarh