Selections from the Peshwa Daftar 2.26.9
Selections from the Peshwa Daftar 2.26.9
- Language
- Marathi
2.26.9
फौजेनिशीं दाहा महिने राहिलों. साताऱ्यांहून आलियाउपरी सवेच इकडे आलों. याजकरितां आगोटीस सेवकास पायांपाशीं यावयाची आज्ञा केली पाहिजे. माझा संवसार बहुत उणा पडिला आहे. तो अर्थ राजश्री सखारामपंत निवेदन करितील. माझा अंगिकार केला आहे, त्याप्रमाणें सेवकाची विनंति ऐकोन विनंति प्रमाणें आज्ञा केली पाहिजे. विनंति उदास न कीजे. राजश्री विठ्ठलपंतांची इतराजी आम्हांवरी आहे हें स्वामी जाणतच आहेत. नेमणुके खेरीज दोनशें शिलेदार, स्वार आहेत व पागा सरकारची मातबरच जाली आहे. त्याची कांहीं नेमणूक नाहीं. सर्व अर्थ ध्यानांत आणावयासी स्वामी समर्थ आहेत. पत्र सविस्तर लिहिल्यावरी आतांच राजश्री नारोशंकर यांचीं पत्रें आलीं. मोटेचें ठाणें खालीं करून घेतलें. कामरगांवच्या मुकाशियासाठीं वणजारे मागती उत्पात राजद्वारीं करणार आहेत. याजकरितां सेवेशीं लिहिलें आहे. स्वामींनीं राजश्री नानांस व गोविंदरायांसी वरचेवरी लिहावें जे. कामरगांव सरकारांत पहिल्यापासून मुकासा पिलाजी जाधव यांस होतांच. मध्यें वणजारी यांस दिल्हा होता. राजश्री मृत्यु पावलियाउपरी वणजाराहि मेला. त्याजवरून गांव खालशास ठेवून अंताजीपंताकडे दिला आहे. पुन्हां वणजारा सातारां चिंतामण गुरव व लखमओजी खोजे यांचे हातें उत्पात करितात. तरी खोजे यास गुरवास ताकीद करून, वणजारे फजीत पावत यैसें करणे म्हणून सातारां राजश्री नानांस व गोविंदरायांस पत्र लिहावयासी स्वामी समर्थ आहेत. स्वामींनीं गांवास रोखा करून खंडणी हुजूरून करून घ्यावी. सेवेसी श्रुत होय हे विज्ञाति.