Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.27: [28-11-1750] Naro Shankar writes to Bhausaheb at Poona how he has been exacting Maratha dues in Bundelkhand. He has been called away by the Holkar and the Scindia to join them at Delhi for helping the Vazir against the Rohillas.

Selections from the Peshwa Daftar 2.27

Language
Marathi

2.27

श्रीगजानन

श्रीमंत राजश्री भाऊसाहेब स्वामीचे शेवेसी. विनंती सेवक नारो शंकर कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. येथील क्षेम वर्तमान स्वामीचे प्रतापेंकरून ता॥ छ ९ मोहरमपावेतों कुशल असे. बहुत दिवस जाले. कृपापत्र पाठऊन सेवकाचा परामर्श न केला. याकरितां चित्त सापेक्षित असे. कृपा करून सांभाल केला पाहिजे. या प्रांतचे वर्तमान तरी वोडसे प्रांतचे हरामखोर सर्व येकत्र होऊन कुंवर भुपालसिंग राजे याचा कनिष्ट नातू यास सिरउपेस्त्छाई पुढें करून खरगापुरवाले व उंझ्याानवाले व पलेरा व कठोर व धमना वगैरे पवार धंदेरे तीन च्यार सहस्त्र पांवलोक व पांचसातसे स्वार जमा होऊन धुंडी केली. वोडशाचे राज्याचा मुछुक ताराज केला. व सरकार खालशाचें गांव मउ-राणीपुरा कुरेछा वगैरे प्रांतचे चालिस पनास गांव मारून मुलकांत बखेड़ा बहुतच केला. देस नांना प्रकारची वर्तमान व पठाणाचे युध्याच्या लबाडीच्या अवाई उठऊन धूम केली. यामुळे सरकारचें नुकसान जालें. राजियास तौं यवज येणें ठिकाणच नाहींसें केलें. मागील टोकपैकीं राजियाने निकाल करून मुलकांत यवज नेमून दिल्हा तो गर्दीस मेलविला. तेव्हां आम्ही फरोकाबाद प्रांते होतो हैं वर्तमान येकून या प्रांतें आलों. तों दिवस बरसांतीचे, यामुळे जागाजागा फौजा पाठविल्या. बंदोबस्त केला. तरी च्यार महिने दंगाच राहिला. उपरांतिक दसरा जाल्यावर राजियास समागमें घेऊन मुलकांत गेलों. हरामखोरांस परागंदा करून राजियाचे मुलकाचा व सरकारच्या मुलकाचा बंदोबस्त करून कुंवर भुपालसिंगास शाशन करून ठिकाणी ठेविलें. तो मागती राजश्री सरदारांची पत्र आलीं कीं, पठाणानी बल केलें आहे, फौजे सहवर्तमान सत्वर येणें. त्याजवरून तिकडं दरमजल जावयाचा विचार केला. तों राजे पृथ्विसिंग यास वेथा जाली. सर्वैच देवलोक जाले. राणी सुधां आकरा स्त्रियानी सहगमन केलें. मागती नया मनसबा निर्माण जाला. तेव्हां कुंवर सांवतसिंग यांस राजतिलक मार्गशीर्ष शुध १० दशमीस सर्व राज्यांचे मतें जाला. सरकारचा नजराणा येणें प्रमाणें करार ठराविला. यैन पंचाहत्तर हजार, कारकुनीचे पंधरा हजार व मशारनलेस हती सिरपाव सरकारातून द्यावा त्याचे दाहा हजार येकूण येक लक्ष रु॥ ठराविले. यवजाचा विचार त्याचे घरचा कळलाच आहे. दोन तीन सालांत राज्यांतून तजवीज करून घ्यावा, तेव्हां वसुलांत येईल. याप्रमाणें इकडील बंदोबस्त करून दरमजल राजश्री सरदारांकडे जात असों. राजे सांवतसिंग यास सिरपाव वस्त्रं पाठवावी. हती सरकारांतूनच दिल्हा, तरी दाहा हजार रु॥ नुकसान होणार नाहीं. नाहीं तरी रु॥ द्यावे लागतील. ये विषई आज्ञा कर्तव्य ते करावी. वस्त्रं व खातरजमेचें पत्र राजे मजकुरास पाठवावयास आज्ञा करावी. बहुत काय लिहिणे. कृपा सेवकावरी करीत असावे हे विज्ञापना.

[१ अग्रेसर.]