Selections from the Peshwa Daftar 2.30: [19-2-1751] Govindpant Bundele reports in the two letters to Bhausaheb about the unsettled conditions in the Doab. He says : The Rohillas have plundered Allahabad (Prayag) and are marching on Benares. People are flying into jungles. Collection of revenues has become impossible. Commerce has received a set-back.
Selections from the Peshwa Daftar 2.30
- Language
- Marathi
2.30
श्री
श्रीमंत राजश्री भाऊ स्वामीचे सेवेसी.
विनंती सेवक गोविंद बल्लाळ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती. तागायत फालगून शु॥ ५ पावेतों स्वामीचे कृपावलोकनेंकरून सेवकाचे वर्तमान यथास्थित असे विशेष. अंतरवेदीकडील वर्तमान तर पठाण आपले फौजेनसी श्रीप्रयागास जाऊन शहर लुटले, जालिले, मदमेवसी केली. तेथून पुढें श्री काशीक्षेत्रास उपद्रव द्यावयासी जाणार. या प्रांती तमाम जमीदार रजवाडियाच्या नजरा फिरल्या आहेत, देहावर नाहींत. तिकडे जयनगराकडे माधोसिंगानेंहि कांहीं बेइमानीसी केली आहे. चहूंकडे कजियाच दिसतो आणि स्वस्ताई बहुत.
Ca 51-7 गल्यास कोणी पुसत नाहीं. सावकारांनीं तो जेथील तेथें दुकानं बंद केली. कोणी हुंडी एक पैशाची करीत नाहींत. गला स्वस्त, त्याजमुळे रयतेकडील पैसा येईना. गुदस्ताची बाकी व साल मजकूरचा पैसा यावा. त्यामध्यें अद्यापि चौथाई पैसा वसूल जाला नाहीं. कोणी पैसा देइनात. गांवाचा गांव पळतो. रयतेकडील पैसा येईना. साहूकारी कर्ज काढावे तरी चहूंकडे कजिये. त्याजकरितां सावकाराहि कोणी कर्ज देइना. आणि अशामधें स्वामीनी सावकाराच्या वगैरे तीन चार लक्षाच्या वराता केल्या आहेत. इकडील वर्तमान तो या प्रकारचे. सरकारी एवज देणे हे तों खरेच. परंतु यंदाचे वरीस मोठे कठीण आहे. स्वामी निभाऊन घेतील तर स्थित राहील. वरकड सविस्तर वर्तमान चिरंजिव बाबूराव याजला लिहिले आहे. ते सेवेसी विनंति करतील. अम्हाकडील बाबूराव विष्णू राजश्री मलहारराऊ होळकर यांचे लष्करी सरकारी ऐवजाचे वसुलास आहेत. त्याणी जयनगरचे सविस्तर वर्तमान आम्हास लिहिलेल्या पत्राची नक्कल करून पाठविली आहे. त्याजवरून सेवेसी निवेदन होईल. यंदा स्वस्ताई बहुत जाली. एक पैशाचा जिन्नस विकत नाहीं. त्याजमुळे इलाज नाहीं. मार्ग कोचमनवर प्रांतीचे मुतलख बंद जाले. जकाती बुडाली. मोठे नुकसान आहे. कोणेही इलाजे पैसा मिळत नाहीं. स्वामी धनी आहेत. ज्यामध्यें स्थित राहे ते स्वामी करतील तरीच आब राहेल. रयतेकडील पैसा चार रोज येत नवता, तर सावकारीयांत हुंडी अगर नगद कर्ज मिळत होते. यास दोन्ही समये येकदां जाले असा प्रसंग आहे. आम्ही कधी याप्रकारे स्वामीस लिहिले नव्हते. दक्षंणेंत कजिया; हिंदुस्थानांत कजीया; याजमुळे सावकारी-यांत एकंदर काम चालत नाहीं. आहे वर्तमान सेवेसी लिहिले आहे. वरचेवर होत जाईल ते लिहित जाऊन. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. श्रीमंत राजश्री नाना स्वामी व आपण खासा उभयेताची रात्रंदिवस चौकी उत्तम प्रकारे असो द्यावी. दहा वीस माणूस जवळ इतबारी असो द्यावे. सारांश सावधानी उत्तम प्रकारे असो द्यावी. मोठ मोठे रजपूत ब्राम्हणभक्त त्याचा विश्वास राहिला नाहीं. याजकरितां विनंति लिहिली आहे. स्वामी तो सावध आहेत. परंतु आपले राज्यांत दरबार सहज आहे. याजकरितां बहुत सावधानी करावी. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.