Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.32: [23-3-1751] Rohilla commander Shadilkhan was defeated by the Marathas.

Selections from the Peshwa Daftar 2.32

Language
Marathi

2.32

श्रीशंकर.

श्रीमंत राजश्री......भाऊ

स्वामीचे सोा

विनंती सेवक दामोदर माहादेव व पुरुषोत्तम माहादेव कृतानेक साा नमस्कार विनंती. येथील कुशल ता॥ छ ६ माहे जमादिलवल मुकाम लस्कर नवाब वजीर व सरदार जिले अंतरवेद नजीक काळी नदी स्वामीच्या कृपावलोकने यथास्थित असे विशेष. जळेश्वराच्या मुकामीहून विनंती पत्र सोा पाठविले आहे त्यावरून सविस्तर श्रुत हो(ईल). शादीलखां पठाण, अहमदखां बंगाशाचा मातबर सरदार, सिकंदऱ्या प्रांती चौ हजारा रावतांसीं व चौं हजार प्याद्यांनसी राहात होता. तो सरदारानी फौजा पाठऊन मोडिला. मुख्य अहमदखां बंगश प्रयागास लागला होता. तो फरुखाबादेकडे परतून येतो. नवाब वजीर व सरदार त्यास मारायास दरकूच जातात. हें सविस्तर वर्तमान श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे पत्रीं लिहिले आहे. त्यावरून [पुढील सुमारें चार पांच ओळी मजकूर फाटण्यांत गेला आहे.]