Selections from the Peshwa Daftar 2.33: [Aug. 1752]
Selections from the Peshwa Daftar 2.33
- Language
- Marathi
2.33
श्री.
राजश्री समेसर बहादर गोसावी यांसी.
[seal: छ]
सकल गुणालंकरण अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य...स्नोा सखाराम भगवंत रामराम विनंती उपरी. येथील कुशल जाणोन स्वकीये कुशल लिहीत जावें. विशेष राजश्री विठल सिवदेव याची फौज व राजश्री गंगोबा तात्या कडील लांबहाते वगैरे फौज व हुजरातची पथके बाबुराव हरी व सेव्याजी आइतोळे व कुकाजी सिवराम व महादजी खंडेराव वगैरे आजी पार उतरले. आम्ही व गाजदी-खान वजीर यापारीच आहो. आपण तिकडून जलदी यावयाचे करावें. उसीर न लावावा.
[* का. सं. प. या. ८५ वरून गाजुद्दीनखान सिंदे होळकरसहित दिल्लीहून नर्भेदेवर आला. त्या वेळचें पत्र. बरोबरच्या सरदारांची नांवनिशी आहे. बाबूराव हरी गुप्ते सखाराम हरीचा भाऊ.]