Selections from the Peshwa Daftar 2.5: [3-5-1747] Letters 5 and 6 contain a description of a pitched battle on 2nd May 1747 near Mangrol (in the territory of Bundi) between the brothers Ishwarsingh and Madhaosingh, two sons of Sawai Jaisingh, who were fighting for the throne of Jaipur. With the help of Malharrao Holkar and Jayappa Sinde, Ishwarsing
Selections from the Peshwa Daftar 2.5
- Language
- Marathi
2.5
श्री
पौ ३० जमादिलावल.
श्रीमंत राजश्री ......बापु स्वामीचे सेवेसी
पोष्य चिंतो कृष्ण कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती उपरी, येथील कुशल तागाईत छ ३ जमादिलावल पर्यंत यथास्थित जाणोन स्वकीये कुशल लेखन आज्ञा करित असिलें पाहिजे. विशेष. माधोसिंग याची फौज राजसिंग घोडचढा व कनीराम व नंदलाल दिवाण व सुरतसिंग शिवब्रम्हपोता ऐसें तोफखाना ऱ्हेकले व सुतरनाळ व जिजाला व बाणाचे उंट यसें जुंजाचें सामानासी हाडोती प्रांतांचीं ठाणीं उठविलीं. धुम फारच केली. ऐसें जाणोन राजश्री मल्हारजी होळकर आम्हास घेऊन निघाले. कूच दरकूच कोटे प्रांतास बारियासी आलों. आखेराम कोटेकर तोहि शामील जाला. दरकूच मांगरोळ प्रांत हाडोती येथें गांठ घातली. छ १ जमादिलावलीं च्यार घटका मागील दिवसापासून च्यार घटका रात्र पावेतों गोळागोळींचें युध्य जालें. उपरांत रात्र जाली तैसेंच वेरा घालून कंबरा बांधून घोड्यावर च्यार प्रहर रात्र उभेच राहिलों. छ २ जमादिलावलीं जुंज प्रातःकाळापासून अस्तमान पावेतों जालें. कछव्याची तमाम फौज बुडविली. लुटुन पस्त केलें. मोठे मोठे पटाईत कछव्याकडील कामास आले. मोठें यश स्वामीस आलें. तमाम हिंदुस्थानांत नक्ष बसला. सरकार पागेस शेंसवारों घोडे व उंटें आलीं. राजश्री सुभेदाराकडील व आम्हांकडील कांहींक लोक ठार पडले
१ सेवेस.
व जखमी जाले. घोडीं ठार पडलियाची याद मागून सेवेसी लिहून पाठऊं. राजश्री मल्हारजी बावास डाव्या हाताच्या मनगटास गोळीची जखम लागली. चाटून गेली. हालकी जखम असें. ईश्वरें खैर केली. त्याची चिंता न करावी. राजसिंग घोडचढा व साळग्रामसा हे दोघे सरदार मातबर व मोठे पटाईत कछव्याचे मारले गेले. सेवेसी श्रुत होये. विशेष काय लिहिणें. कृपा लोभ असों दीजे, हें विनंती.
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English