Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.6: [7-5-1747]

Selections from the Peshwa Daftar 2.6

Language
Marathi

2.6

श्री.

छ ३ जमादिलाखर

श्रीमंत राजश्री......बापु स्वामीचे सेवेसी.

पोष्‍य चिंतो कृष्ण कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. येथील कुशल तागाईत छ ७ माहे जमादिलौवल पर्यंत यथास्थित जाणोन स्वामींनीं आपलें स्वकुशल लेखन आज्ञा करित असलें पाहिजे विशेष. आमचें वर्तमान तर अंतरवेद प्रांताहून उजेनसि आह्‍मों; पुढें देशास यावें तों हाडोतीं प्रांतीं माधोसिंगाचे फौजेनें तमाम ठाणीं उठविलीं. धूम फार केली. त्याकरितां राजेश्री......सुभेदार यानी आम्हां समागमें * * * * कूच दरकूच मौजे मांगरोल प्रांत * * * * कछव्याचे फौजेस बारा कोस धा * * * * * * घातली. छ १ जमादिलौवलीं दिवस च्यार घटका * * * * * राहिला. त्यासमयीं गांठ पडली. युद्ध (च्यार) घटका रात्र पावेतों गोळागोळीचें जालें. उपरांत च्यार प्रहर रात्र पावेतों घोड्यावर बसलेच राहिलों. त्यास कछव्याची फौज राजसिंग घोडचढा * * * * व कनीराम व नंदलाल दिवान व सुरतसिंग शिवब्रह्मपोता यैसें फौज दहा बारा हजार व तोफा, र्‍हेकले, जेजालाचे उट वगैरे प्यादे जुंजाचा सरंजाम सुद्धां होते. त्यास छ २ जमादिलौवली रविवारीं रुजू इंदुवारीं झुंज प्रातःकाळपासून अस्तमान पावेतों जालें. कछव्याची फौज दरोबस्त लुटून पस्त केली. तोफा, र्‍हेकले, घोडे, उंटें, हत्ती सर्व लुटून घेतली. माधोसिंगाचे (लोक) मोठे मोठे पटाईत कामास आले. कितीक ज * * * * * सांपडलें, शें दोनशें पळूंन गेले. वरकड * * * * * * * विलीं. हिंदु- स्थान प्रांतीं मोठा नक्ष जाला. मोठें यश स्वामिस आलें. सरकार पागेस घोंडीं शें सवाशें आलीं व उंटें आलीं व हत्ती येक आला. ईश्वेरें मोठें यश दिल्हें. हत्ती कोटेकरास दिल्हा. कोटेकराचे लोक राजश्री अखेराम पचोली व जालमसिंग झाले, व धायेभाई वगैरे रजपुत दोन तीन हजार फौज होती; त्यांनीं स्वामी सेवेसी अंतर न केलें. आम्ही व राजश्री खानाजी जाधव, डाव्या बाजूस राजश्री सुभेदाराच्या होतों. शिंद्याच्या निशाणास शब्द लागों दिल्हा नाहीं. आपले बाजूस अवघ्याच्या आधीं उठावणी केली, स्वामी सेवेसी अंतर न केलें. श्रुत होये. सदैव पत्र पाठऊन परामृष करीत जावा. विशेष काय लिहिणें. कृपा लोभ असो दीजे, हे विनंती . . . . .