Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.53: [6-11-1755] Autograph letter of Dattaji Scindia encamped at Nagore States he is confident of victory.

Selections from the Peshwa Daftar 2.53

Language
Marathi

2.53

श्री.

श्रीमंत राजश्री दादासाहेब स्वामीचे सेवेसी.

विनंती सेवक दत्ताजी सिंदे कृतानेक दंडवत विज्ञापना. सेवकाचे वर्तमान ता॥ छ १ सफर मो॥ नागोर स्वामीचे असिर्वादे येथास्थित असें. विशेष येथील वर्तमान जोतपुर व जालोर वगैरे कछव्याचे फौजेचे तपसीलवार पुरवणीपत्री सेवेसी विनंती लिहीली आहे त्यावरून विदीत होईल. सारांश रागड्यानी स्वामीचे तेजप्रतापापुढें अधिक करावे ऐसे नाहीं. सर्वहि पादाक्रान्त होतील. सेवेसी श्रुत होय हे विज्ञाप्ति.