Selections from the Peshwa Daftar 2.52: [28-9-1755] Antaji Mankeshwar writes to his agent at Poona from the banks of the Jumna about certain changes in the staff that Raghoba had effected in the management of the territory of the Doab. He adds he is proceeding to Marwar to succour Scindia's forces who had suffered from the murder of Jayapa.
Selections from the Peshwa Daftar 2.52
- Language
- Marathi
2.52
श्री.
भाद्रपद वद्य दशमीस पत्रें आलीं मशारनिल्हेकडून.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री मुकाशीबावा व राजश्री बाजीपंत बावा व गणेशपंत दिवाणजी स्वामीचे सेवेसी.
पोष्य अंताजी माणकेश्वर, साष्टांग नमस्कार विनंती उपरी. येथील कुशल तागाईत श्रावण वद्य १३ त्रयोदशी, मुक्काम नजीक कोंच, येमुनातीर जाणून स्वकीयें कुशल लेखन करीत गेलें पाहिजे विशेष. बहुत दिवस पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं, तरी सविस्तर लिहावें. आम्हांकडील वर्तमान तरी श्रीमंत राजश्री... दादासाहेबांनीं, राजश्री गोपाळराव गणेश यांस, कुराजाहानाबादचा मामला अंतरवेदींतील, राजश्री गोविंद बल्लाळ यांकडे होता तो दूर करून सनदा देऊन आमचे हातीं दिल्हें जें... यांचा अंमल बसऊन देणें. त्यावरून आम्हीं दरकूच कालपीस गेलों. राजश्री हरीपंत बावांची भेटी जाली. अंतरवेदींतून राजश्री गोविंद बल्लाळ आले. त्यास गोविंदपंत मामला सोडीत नाहींत. दरबारास जाऊन फडच्या करून, यसें बोलिले. आम्ही पार जावें इतकियांत राजश्री दत्ताजी शिंदे यांचीं पत्रं मारवाडांतून आलीं जें, राजश्री जयाजी शिंदे यांस दगा जाला. तरी तुम्ही पत्रदर्शनीं स्वार होऊन दाहा हजार फौजेनिशीं येणें. मग पत्र वांचणें. येशीं लागोलाग च्यार पांच पत्रं आलीं. त्यास वरकड कामें टाकावीं सारखीं जालीं. येक मारवाड सर जालें, तरी तमाम हिंदुस्थानांत बंद होईल. साहेबकाम भारी जाणून अंतरवेदींत न जातां दरकूच मारवाडांत चालिलों. आम्हीं देशांहून आलों तें समयीं पांच हजार फौज होती. ज्याजती विठ्ठल शिवदेव, नारो शंकर वगैरे यांकडील अडीच हजार फौज नवी ठेविली. येकूण साडेसात हजार व जाजती भदावरकर, शेंवढेकर व राजे गोपाळसिंग व जाठ वगैरे अडीच हजार फौज ठेऊन दाहाहजारांनिशीं बाराबारा कोसांच्या मजली करून मारवाडांत चालिलों. श्रीमंतांचे पुण्येंकरून ईश्वर उत्तमच करील. आपणांस कळावें म्हणऊन लिहिलें असें. राजश्री हरीपंत बावा कालपीस सुखरूप आहेत. वरकड दरबारचें वर्तमान सविस्तर लिहावें. राजश्री विठ्ठल शिवदेव येथून कंबर बांधोन आले आहेत. आपण घडीघडीची बातमी राखावी. चिरंजीव आपा व बाबूराव तुम्हांकडे येतील. त्यांस सालाबादप्रमाणें शेतसनदा व कोंकणचीं दस्तकें व वेठेबिगारी गवत कापावयाचे वगैरे जें सालाबादप्रमाणें असेल तें दप्तरीं रुजूं पाहून कागदपत्र, सनदा, वराता, सालमजकुरीं लिहून घेऊन मुलांचे हवाला करणें. राजश्री मल्हारराव बाबा रास्ते यांस पत्र पाठविलें आहे. तें त्यांस द्यावें. आमचें तीन महाल इटावा, फुफुंद, सुकोराबाद, अंतरवेदींत जागिरीचे आहेत, तेथील मक्ता श्रीमंत राजश्री दादासाहेबांनीं करून तेथील मामला गोविंद बल्लाळ यांकडे आमचे तर्फेनें दिल्हा असतां, राजश्री नारो शंकर, श्रीमंतांपाशीं रदबदली करीत आहेत; ज्याजती चड लावितात म्हणून ऐकिलें. त्यास आम्ही जागीर मुफत मिळविली नाहीं; कष्ट मेहनत करून मिळविली आहे, यसें असतां नारोपंतीं चढ जाजती करावा हें उत्तम नाहीं. नारोपंतास रुपये बहुत जाले तरी दानधर्म करावा अथवा श्रीमंतांस नजर द्यावी. येविशीं श्रीमंतांस विनंति करून नारोपंतास निक्षून ताकीद करवावी. फिरोन आमच्या मामलियांचें नांव—हे सरदारी बाग तुमची आहे, दिला तरी नुकसान तुमची. कल्याण आसिलें तरी तुमचें. दुशमन फार आहेत. सावध राहून थोरले येजमान भारोस गोवणें हें विनंती.
[सबंध पत्र जनकोजीच्या हातचें. * जयाप्पा नागोरास ता. ३० जून १७५५ रोजीं मारला गेला त्यानंतरचें पत्र असावें.]
[Ca 51—10]