Selections from the Peshwa Daftar 2.55: [Date of receipt 25-12-1755] Autograph letter of Jankoji Scindia (second sheet missing) with reference to the movements of Madhosing's forces.
Selections from the Peshwa Daftar 2.55
- Language
- Marathi
2.55
श्री.
छ २० सफर.
सेवेसी विज्ञापना. राजे माधोसिंग जयेनगरकर याजकडें बिजेराम पुरोहित बिजेसिंगाकडोन जयेनगरास गेला आहे. त्यावरून त्यानी आपल्या फौजा जमा करून अनरुधसिंग याजबरोबर नरायेणावर व रामगडावर जगंनाथ साहा याजबरोबर फौजा व तोफखाना पाठविला. त्याचे मुकाबन्यास येथून राजश्री राणोजी भोईटे पाठविलें होतें. परंतु त्याची फौज भारी, आम्हाकडील थोडकें, हें त्यानीं वर्तमान यैकोन अनरुधसिंग याने नरायेणाहून कूंब करून रामगडावर आला. जगंनाथ सा आपण येका ठिकाणीं जालें. हे वर्तमान आम्हास कळताच येथून राजश्री नरसिंगराव सिंदे व खानाजी जाधव याजबरोबर आपली फौज देऊन, व सवाईराम भंडारी रामसिंगाकडील, त्यासही समागमें देऊन, रवाना केलें. राणोजी भोईटे व हे येकत्र आल्यानंतर त्यानी संदर्भ लाऊन सल्लखाच्या गोष्टी बोलू लागले. त्याच्या याच्या भेटी आस्विन * * * *