Selections from the Peshwa Daftar 2.56: [January 1756] This appears to be Antaji Mankeshwar's letter (first two sheets missing) describing his march towards Marwad to the help of the Scindia.
Selections from the Peshwa Daftar 2.56
- Language
- Marathi
2.56
श्री
* * रविलाखर.
पुरवणी श्रीमंत राजश्री पंतप्रधान.
स्वामीचे सेवेसी.
विज्ञापना. या मोहिमेमुळे कर्ज फार जालें. आगऱ्यांच्या सावकारात पत चांगली होती व रा॥ गोविंद बळाळ याणी उपराळां सरंजाम पैकीं व कर्जाऊ उभारणी केली, म्हणून मोहीम सिधीस नेली. सुरजमल जाटाच्या चितापासून आम्हास दगा करावा, पुत्र दहा हजार निवड करून व माधवासिंगाचा बक्सी मिळोन कोटे तरी दगा करावा, ऐसे होते. परंतु स्वामीचा प्रताप थोर. सेवकानेंच त्यांचा मुलुक मारून त्यांच्या उरावरून आलों. त्याणीच सेवकाची दहशत खादली. स्वामीची कृपा चितापासून मजवरी आहे ते कृपेनें जेथं जाईन तेथें स्वामीचा नक्ष राखीन. स्वामीने खानजादावरी अधिकोतर कृपा करीत असीलिया सेवकापासून मोठी मोठी चाकरी होऊन येईल. खासगत वर्तमान तरी आमच्या फौजेत एकाच्या चितांत नवतें जे मारवाडांत जावें. मारवाडांत पाच सेर दाणे व एका रुपयाचें गवत एका घोड्यास पुरेना. पाणी दीडशे हातावरील व मार्ग कठीण. मध्ये आडवे जाट कछवे वगैरे फौजा. येवढे संकटात न जावें; अंतरवेदीत असावें; परंतु राजश्री जयाजीआपासारिखा सरदार मारिला गेला. रा॥ दत्ताजी सिंदे यांची पत्रं नाना प्रकारचीं आलीं. मुख्य स्वामीचे निरोपाचे समईंहि मजला आज्ञा केलीच होती व रा॥ आपाहि माझा हरएकविसीं भरंवसा राखीत होते. या गोष्टीवरी नजर देऊन आपले सर्व स्वार्थ एकीकडे ठेऊन जिवाचा संकल्प करून कर्ज जेथवरी मिळेल तेथवरी मेळऊन येऊन पोहोचलों. येथें आल्यावरी राजश्री जनकोजी बाबा व दत्ताजी बहुत संतोषी जाले. स्वामीचा पुण्यप्रताप; तरी पुढें याउपरी उत्तमच मनसबा घडोन येईल. गोहदकर जाट याणी आतां आम्हांसी सलूख चांगला केला. फौज चाकरीस सांगाते दिल्ही आहे; व निमे मुलुक वांटून द्यावा, त्याच्या वाटण्या केल्या आहेत. याउपरी गोहदकराविसी तेथे कोणी पुण्यं वेचील तरी स्वामीनी ध्यानास न आणावें. भदावरकर राजे यांस टिकों करून हत्ती घोडा वस्त्रे सिरपाव श्रावणमासीच दिल्हा. हत्ती घोडा सिरपावाचे परभारे दहा हजार निराळे करून, निवळ सरकारची नजर पंनास हजार रुपये करून, सहा महिनियांचे मुदतीने सावकारी निशा आम्ही करून घेतली. याखेरीज त्याणी आम्हांस कांही कबूल करून टीप जेष्ठ मासचे मुदतीची करून घेतली आहे ते मुदतीस त्यापासून घेऊन, तेहि कलम सरकारचे सरकारांत जमेस येईल. परंतु रा॥ नारो शंकर त्यासी आदावत करितील, तरी त्यास स्वामीनी ताकीद करून भदावरकरांस गौरसीचे पत्र पाठवावें. नारो शंकर यांचे कारकून आम्ही बोलाविले. त्याणी साफ उत्तर पाठविलें जे राजा भिकारी आहे, दाहा पंधरा हजार रुपये करार कराल तरी आम्ही येऊं, नाहीतरी तुम्ही जाणा ते जाणा. मग आम्ही परभारें केले. सरकारचे जाले तेहि सरकारचें व आम्हास देऊं केले तेहि सरकारचेंच. याप्रमाणें आहे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.
[१ पत्र जनकोजी सिंद्याचें. हस्ताक्षर सर्व स्वतःचें. एकच बंद एवढा उपलब्ध झाला.]
[१ पुण्य वेचणें = वाईट सांगणें, कान भरणें.]
[२ टिका करणें. = तिलक लावणें.]