Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.9: [पौ. 21-4-1748] New-letter sent from Delhi to Bhausaheb stating an account of the fight of the Emperor with Abdali, in which Vazir Kamruddin Khan was killed; and of the subsequent visit of the Peshwa to the Emperor who was highly pleased with the former's demeanour.

Selections from the Peshwa Daftar 2.9

Language
Marathi

2.9

श्री.

छ ३ जालोवल.

पु॥ तीर्थरूप राजश्री भाऊ स्वामीचे सेवेसी.

विनंती उपरी राजश्री बगाजीपंत यांचे पत्र छ १३ राखरचे छै २३ मिनहूस आपणास आले. त्या पत्रांतील मजकूर पातशाही वजीर व शाहाजादा व अमीर यांची व पठाणांची लढाई झाली. वजीर कामास आला. उभयपक्षी बहुत लोक मारले गेले. पातशाहाची फौज काईम राहिली. पठाणांनीं सिकस्त खादली. हें साद्यंत वर्तमान आपण लिहिलें तें कळो आले. राजश्रीय तुम्हे विचारें आलें तर निवेदन करणे. नाहीतर पुसतील तेव्हां सांगणे, म्हणून स्वामीनी लिहिले. तर बऱ्हानपुराहून कासीद आले: त्यानी जबानी वर्तमान राजश्री स्वामीजवळ सांगितलें कीं, दिलीची पत्रें नबाबास आली. त्याचा मजकूर कीं, पातशाहाजादियाची व पठाणाची लढाई वरजोर जाली. वजीर कामास आला. दुतर्फा लोक फार मारले गेले. पठाणाचा मोड जाला. हे वर्तमान सांगितलें. दुसरें वर्तमान सांगितलें कीं श्रीमंत राजश्री पंत प्रधान दिलीस गेले. पातशाहाची मुलाजमत जाहली. पातशाहानी श्रीमंतास पुसिलें, तुमचे काय मुद्दे आहेत ते लेहून द्यावे. त्याजवरी श्रीमंतांनीं उतर केले कीं, हजरतीची फते जालियावर अर्ज करूं. आधी ज्या कार्यास आलों, ते फते जाले म्हणजे आमचे कार्य होईल ऐसा अर्ज केला. त्याजवरून पातशाहा बहुत खुषवख्त जाले. हे वर्तमान राजश्रीनी श्रवण केल्यावर आम्हास पुसिलें. तुम्हाकडे कांहीं वर्तमान आले की काय? त्याजवर आम्ही विनंती केली कीं कागदपत्र अद्यापि आला नाहीं. परंतु जबानी खबर याप्रमाणेंच आईकतो. त्याजवरी राजश्री बोलिले. प्रधान पंतानी पातशाहासी बहुत उतम समर्पक उतर केले. आम्ही सांगितल्याप्रमाणें दिलीस गेले. पातशाहा संतोषी जाले. उतम गोष्टी केली. तीर्थरूपांचा स्तव फारच केला. समाधान पावले. आम्ही उतर केले कीं साहेबाचे पुण्ये प्रतापे सर्व गोष्टी होतात. साहेबांची पूर्ण कृपा राजश्री प्रधान-पंतावर. तदनरूप त्याचीही पातशाहासी जाबसाल केला. या मजकुरावरून राजश्री बहुतच संतोष पावले. दोन तीन वेळ तीर्थरूपांचा स्तव केला. सांप्रत आपण वर्तमान लिहिलें हेहि राजश्री स्वामीस निवेदन करून: सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.

[१ ११-४--१७४८.]