Selections from the Peshwa Daftar 2.8: [1-8-1747] Krishnarao Bapuji (Parasnis ?) writes to Bhausaheb news from the Court of Delhi and news about the threatened invasion of Nadirshah.
Selections from the Peshwa Daftar 2.8
- Language
- Marathi
2.8
श्री
श्रीमंत राजश्री......भाऊ स्वामींचे सेवेसी.
विनंती सेवक कृष्णराव बापुजी साष्टांग नमस्कार विज्ञापना. येथील वर्तमान ता॥ छ ९ रजब पावेतो यथास्थित असे विशेष. स्मरणपूर्वक कृपापत्र प्रविष्ट होऊन सनाथ जाहालो. ऐसेच सदैव कृपा करणार स्वामी समर्थ आहेत. नवल विशेष वर्तमान लिहिजेसें नाहीं. यात्रेदाखल येदाची मुलुख (गीरी) जाहाली. (दी) लीचे पातशाः नाचरागरंगामध्ये निमग्न आहेत. दुसरा नादरशाहाचा भाचा आदलशा म्हणून फौजेसह् वर्तमान दिलीवर यावयाचे विचारें कंधारेस आला. पुढे काय होईल ते पाहावे. मजल दरमजल सेवेसी येतो. भेटी-अंती सविस्तर निवेदन होईल. कृपा करणार स्वामी समर्थ आहेत. बहूत काय लिहिणे हे विज्ञापना.