Selections from the Peshwa Daftar 21.89: [24-10-1761] News letter to the Peshwa from Delhi written by his Vakil Bapuji Mahadev Hingane.
Selections from the Peshwa Daftar 21.89
- Language
- Marathi
21.89
छं २९ रविलाखर
[seal: श्री]
पुरवणी श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसीं
विज्ञप्ति यैसीजे. छ २४ रबिलावर्ली राजे नागरमल व याकुबअलीखान व अबदुल आहदखां सर्व मंडळी येक जागा होऊन नजीबखानापासीं गेले आहेत.
[१ (नगरसेटीचे नांर्वे एक पत्र?)]
[२ अक्षर वेगळें.]
दो गोष्टी * * विचार मसलत होती कीं नागरमल यासी ठाकूर सुरजमलोपासीं पाठविलें पाहिजे. कां कीं ठाकूर सुरजमलास समजाऊन दिलीजवळ आणावें, नजीबखानाची व ठाकराची भेट होये, मग ठाकराचे पुत्रास नजीबखानाबराबर घेऊन सर्व मंडळीनें पातशाहापासी जावें. दुसरे हाही विचार आहे कीं सर्वानी नजीबखानसुधां एकत्र होऊन वचनप्रमाण राजे रजवाडे वगैरेसी करून मग पातशाहापासीं जावें या विचारांत आहेत. अद्याप ठरल नाहीं. ठरल्यावर सेवेसी विनंती करूं. छ २५ रबिलावल्लीं नजीबखानास रुखसत जाली. हंसी हिसाराकडे बंदोबस्तास जाणार. छ मजकुरीं राजे नागरमल यास ठाकूर सुरजमलाकडे रुखसत केलें की ठाकरास घेऊन दिलीस यविं. तोवर नजीबखानहि पंधरा दिवसानीं फिरून दिलीस येईल. मग ठाकराची व याची भेट होऊन मग पातशाहाकडे जावयाचा विचार ठरेल तो विनंती सेवेसी लिहूं. कृपा केली पाहिजे हे विज्ञप्ति.
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English