Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 21.90: [Date of receipt 23-11-1761] This and the previous letter report some intrigue between Surajmal and Najib.

Selections from the Peshwa Daftar 21.90

Language
Marathi

21.90

छ २९ रबिलाखर

[seal: श्री]

पुरवणी श्रीमंत राजश्री पंतप्रधान

स्वामींचे सेवेसी

विज्ञप्ति यैसीजे. राजे दलेरर्सिंग व रूपराम व मोहनसिंग ठाकूर सुरजमळापासीं छ ८ रबिलावलीं दनकोरास गेले होते. पांच रोज ठाकरापासी राहून जाबसाल पका केला. छ १६ रबिलावलीं दिलीस आले. छ १७ रोजीं नजीबखानापासीं गेले. जाबसाल नजीबखानाचा व ठाकराचा सलूक ठरला. परगणे झझर वगैरे ठाकूर सुरजमळापासीं बाहल राहिले. कांहीं येवज देणे सालबसाल ठरला. त्याचे जामीन राजे नागरमल ठरले. ये गोष्टीची शपथ अणभाष व्हावयासी फिरोन राजे चेतराम व दलेरर्सिंग नजीबखानाचे तर्फेनें कुरान घेऊन ठाकरापासीं गेले.

[१ निरोप.]

[2284]

आतां ठाकराचें व नजीबखानाचे भेटीचा मजकूर आहे. ये गोष्टीचे जाबसालास च्यार दिवस ठाकरास लावणें यास्तव श्रीगोवर्धनचे मेळ्यास गेले. या उभयेतांसहि बराबर नेले. पुढें होईल ते विनंती सेवेसी लिहूं. कृपा केली पाहिजे हे विज्ञप्ति.

@D [1761-62 ?