Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 21.95: [29-1-1757] Antaji Manakeshwar from Barapula reports the news of the descent of the Abdali upon Delhi and the writer's movements consequent to it.

Selections from the Peshwa Daftar 21.95

Language
Marathi

21.95

पौ छ १४ रजब

श्री

श्रीमंत राजश्री भाऊसाहेब स्वामीचे शेवेसी

विनंती. सेवक अंताजी माणकेस्वर कृतानेक सा नमस्कार विज्ञापना. सेवकाचे वर्तमान ताा माघ शुध ९ नवमीं मुकाम नजीक बारापुले यथास्थित असे विशेष.

2288 अटकेपलीकडून आबदाली दिलीस दाखल जाला. पातशाही चाकर तमाम त्याणी भेदले. वजीर येकलाच व आम्ही राहिलो. त्याजवरी वजिरासहि अवसान न पुरे तेव्हा तोहि जाऊन भेटला. त्यास कैद केले. त्याजवरी आम्हासी आबदालीच्या वजिरासी दोन लढाई जाल्यिावरी आम्ही बुनगे पुढे घालून निघोन फरिदाबादेस दाहा कोस येऊन बुनगे मथुरेस रवाना करून माघारे सडे फौजनसी जाऊन बारापुल्यावरी उभे राहून त्याची फौज आली त्यासी लढाई घेऊन त्यास मोडून घातलियाचे तपसीलवार वर्तमान साद्यंत आजी दाहा दिवसात दोन जोड्या कासीद तपसीलवार वर्तमान लिहून सेवेसी रवाना केले त्याजवरून सर्व वर्तमान स्वामीचे ध्यानास आलेच असेल. प्रस्तुतहि तपसीलवार पाच बंद वर्तमान सविस्तर श्रीमंत राजश्री नानासाहेबाचे पत्री लिहिले आहे त्याजवरून सर्व अर्थ स्वामीच्या ध्यानात येईल. सारांश वकिलाचें आचरणाचा अर्थ सेवकांनी कोठवर ल्याहावे ? त्याचे अनुष्ठान सबल, यासी कोणाचा हि विलाज नाहीं. या दिवसात श्रीमंत राजश्री दादासाहेब व राा मल्हारजी होळकर यानी सनिध असावे म्हणजे शत्रूचे निर्मूल होऊन शत्रू येथील पैसा नेणार तो सर्व सरकारात लागेल येविसीं विनंतीपत्रे श्रीमंत राजश्री दादासाहेबास पाठविलींच आहेत. सारांश सेवकाचे श्रमसाहास कोणेप्रकारे आहेत हे स्वामीच्या ध्यानात यावे. सर्वांनी तमाशाच पाहिला. शेवटपरियेंत पुढेहि तमाशाच पाहणार. परंतु स्वामीच्या पुण्यप्रतापेंकरून सेवक सरकारच्या मुलकास उपसर्ग लागो देणार नाही. स्वामीकार्यावरी जीव हजीर आहे. फौजेस नेमणूक सालगुदस्ता सालमारी मिलोन येक रुपया नाही. तीन साल स्वारी मेहनत या प्रकारची. साहुकाराची कर्जे कोठवरी घेऊन खावी ? सर्व गोष्टीचा परिहार करणार स्वामी समर्थ आहेत. तूर्त आमचे जागिरीचा येवज राजश्री गोविंद बलाल यासी ताकीद करून देवणार स्वामी समर्थ आहेत म्हणजे कर्जदारास थोडेबहुत पाऊन पत राहील. सेवेसी श्रुत होये हे विज्ञापना.

Discussed in (1)