Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 21.94: [5-12-1761] Khanaji Jadhao describes how he and Malharrao inflicted a crushing blow on the army of the Kachhawas led by Madhosing. Malharrao Subedar received a slight wound on his wrist.

Selections from the Peshwa Daftar 21.94

Language
Marathi

21.94

पौ छ ३ जाखर

श्री.

राजश्री सखारामपंतबापू गोसावी यांसी

ऽ सकलगुणांलकरण अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्ये श्नो खानाजी जाधवराव दंडवत विनंती उपर. येथील कुशल ता छ ७ जौवल मुकाम बडोदे प्राा सोपार जाणोन स्वकीये लेखन करीत गेले पाहिजे विशेष. इकडील वर्तमान तर राजश्री माधोसिंग याची फौज दाहाबोरा हजार येऊन प्रो नेणव्यास मोरचे लाविले. त्यास राजश्री सुभेदार व आम्ही यैसे पांचसां हजार फौजेनी कूच दरकूच मुकुंदबारीपंत आलो. आखेराम पंचोळी याच्या भेटी जाल्या. उपरांतिक आखेराम कोटेवाले याही तीन हजार फौज घेऊन आम्हास सामील जाले हे वर्तमान कछेव्याचे फौजेस नेणव्यांस गेले. त्याही कूच आमचे दहशतीने कूच करून हडोतीचे प्रगण्यात येऊन धामधूम करून तमाम ठाणीं उठविली. आम्ही कूच दरकूच छ १ जमादिलावली गाठून आठ प्रहरपर्यंत कमरा बांधोन उभे राहिलो. त्यास छ २ जमादिलावली झुंझ च्यार प्रहर होऊन कछव्यांचे फौजेचा मोड जाला. त्याजकडील थोर थोर पटाईत कामास आले व काही जखमी. दोनकसें पलोन गेले. बाकी आबघे कतल केले. दोन हती तोफखाना व जेजाले वगैरे सरमजाम लुटून घेतला. ईश्वरे थोर येस दिल्हे. हिंदुस्थानात नकशा राहिला. राजश्री सुभेदार याचे डावे हाताचे मणगटावर गोली चाटून गेली. ईश्वरे थोर खैर केली. कांहीं चिंता नाही. सरकारपागेत घोडीं व उंट मिलोन सेदीडसे आले आहेत. आम्ही डावे बाजूस होतो. सरकार चाकरी केली ते आपणास श्रीमंत राजश्री सुभेदार यानी लिहिले आहे त्यावरून कळो येईल. सिंद्याच्या निशाणास शब्द लागो दिल्हा नाही. सदैव पत्र पाठऊन संतोषवीत जावे. विशेष काये लिहिणे ? लोभ असो दीजे हे विनंती.